उमीद पोर्टलवर शंभर टक्के नोंदणी करा - अल्पसंख्याक आयुक्त प्रतिभा इंगळे

 0
उमीद पोर्टलवर शंभर टक्के नोंदणी करा - अल्पसंख्याक आयुक्त प्रतिभा इंगळे

उमीद पोर्टलवर वक्फ संस्थांचे वेळेत शंभर टक्के नोंदणी करा...

अल्पसंख्यांक आयुक्त प्रतिभा इंगळे यांनी घेतला आढावा

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज)- केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक्त विभाग कडून उमीद - 2025 कायद्यान्वये पोर्टलवर सर्व वक्फ संस्थांची नोंदणी करणे अनिवार्य आहे. यासाठी 5 डिसेंबर 2025 शेवटची तारीख आहे, राज्य वक्फ मंडळ कडून राज्यातील सर्व संस्था पोर्टलवर नोंदणीकृत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याची गरज आहे. त्यासाठी योग्य नियोजनबद्ध काम करा, जो कोणी कामचुकारपणा केला तर त्याच्यांवर कारवाई करा, मात्र वेळेत काम करा, पोर्टलवर नोंदणी शंभर टक्के होणे गरजेचे आहे. अशा स्पष्ट सूचना राज्य अल्पसंख्यांक आयुक्त प्रतिभा इंगळे यांनी केल्या.

देशातील सर्व वक्फ संस्थांची नोंदणी ही उमीद पोर्टलवर करण्याचे केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालयाने निर्देश दिले होते. जुलै 2025 मध्ये यासाठी सहा महिन्यांचा वेळ देण्यात आला होता. त्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा कार्यालयाकडून पोर्टलवर नोंदणीचे काम सुरू झाले. आता पर्यंत वक्फ मंडळ अंतर्गत जिल्हा कार्यालयाकडून पोर्टलवर किती नोंदणी झाली, काय नियोजन केले या बाबत विचारपूस करत कामाचा आढावा घेतला. प्रतिभा इंगळे यांनी कमी दिवस शिल्लक असल्याने जिल्हावार जनजागृती कार्यक्रम घ्या, लोकांच्या अडचणी लक्षात घेता जिल्हा कार्यालयात हेल्प डेस्क बनवा. विचारपूस साठी अधिकाऱ्यांचे नंबर मीडिया व सोशियल मेडियावर द्या, कामाची गती वाढवा अशा सूचना केल्या. निष्काळजी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वेळीस कारवाई करा,असे आदेश ही दिले.

आयुक्त इंगळे यांनी पाणचक्की येथील सर्व विभागात जाऊन कर्मचारी व अधिकारी वर्गाशी उमीद पोर्टलवर चर्चा केली. त्यांना येणारी अडचणी बाबत विचारपूस करत अडचणी त्वरित दूर करण्याचे आदेश वरिष्ठांना दिले. यावेळी त्यांच्या सोबत मार्टीचे सल्लागार रशीद शेख, जिल्हा वक्फ अधिकारी शोएब मुसा, फैजान सय्यद व इतर कर्मचारी उपस्थित होते.

ऐतिहासिक पाणचक्की वास्तूंची केली पाहणी...

आयुक्त प्रतिभा इंगळे यांनी वक्फ मंडळ कार्यलय परिसरात असलेल्या पुरातत्व विभागाच्या अंतर्गत असलेल्या ऐतिहासिक वास्तूंची पाहणी केली. यावेळी या वास्तूंची देखरेख व जतन करण्याच्या सूचना केली. त्यांनी पाणचक्की, दरगाह, हौद खाली असलेला शंभर फुटाचा तळ मजला, अतिथीगृह व इतर वास्तूंची पाहणी केली. उपमुख्यकार्यकरी अधिकारी मुशीर शेख यांनी सुफी परंपरेचे ऐतिहासिक महत्व समजावून सांगितले, दरगाह अबुल उलाई नक्षबंदी कादरीयांची दरगाह योग्य जतन केल्या बाबत मुशीर शेख यांचे कौतुक केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow