उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना दिली मतमोजणी प्रक्रीयेची माहिती
 
                                उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना दिली मतमोजणी प्रक्रियेची माहिती...
औरंगाबाद, दि.27(डि-24 न्यूज) मतमोजणी प्रक्रिया येत्या मंगळवार दि.४ जून रोजी पार पडणार आहे. या प्रक्रियेची माहिती आज उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना देण्यात आली.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यावेळी उपस्थित होते.
मतमोजणी केंद्र परिसरातील सुरक्षा व्यवस्था, उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी यांच्यासाठीची प्रवेश व्यवस्था, ओळखपत्रे, प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रिया व्यवस्था याबाबत माहिती देण्यात आली. मतमोजणीसाठी उमेदवार प्रतिनिधी नेमणूक करण्यासाठी भरुन द्यावयाचा फॉर्म हा दि.१ जून रोजी सायं. ५ वाजेपर्यंत देण्यात यावा,अशी माहितीही देण्यात आली. मतमोजणीच्या ठिकाणी सकाळी ५ वा. कर्मचाऱ्यांचे तिसरे यादृच्छिकीकरण होऊन त्यांची संबंधित टेबलावर नियुक्ती होईल, त्यानंतर सकाळी ७ वा. आपल्या टेबलवर ते स्थानापन्न होतील, साहित्याची पडताळणी करुन सकाळी ८ वा मोजणीस सुरुवात होईल. टपाली मतदानाची मतमोजणी आधी होईल. त्यानंतर लगेचच मतदान यंत्रांची मतमोजणी केंद्राची सुरक्षा व्यवस्था इ. बाबत माहिती देण्यात आली.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            