एकच पंप सुरु किमान तीन पंप सुरु केल्याशिवाय पाणीपुरवठा सुरळीत होणार नाही - डाॅ. राजेंद्र दाते पाटील
 
                                चीत मै जिता पट तु हारा
एकच पंप सुरू किमान तीन पंप सुरू केल्या शिवाय पाणी पुरवठा सुधारणार नाही जेष्ठ जल अभ्यासक डॉ. राजेंद्र दाते पाटील
एक सखोल चौकशी करणारी उच्चाधिकार चौकशी समिती नेमा दोषींवर गुन्हे दाखल करा...
तांत्रीक अडचणी सोडवल्या शिवाय पाणीच देता येणार नाही. शहरात १९११ कि.मी.लाईन शहर भरात टाकण्याची गरज आहे.
छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज) भविष्यात नागरिकांचा जीव घेणार नियम म्हणजे पाणी पुरवठा उपविधी 2011 कायम स्वरुपी रद्द करण्याची घोषणा प्रशासन का बरे करत नाही ? पाणी पट्टी वाढविण्याचा छुपा डाव कोणासाठी आखला आहे ? त्यावर प्रशासन बोलत नाही ना पाणी मीटर बसवण्याचा मनसुबा कोणा साठी रचला गेला आहे हे पण प्रशासन सांगत नाही ? हे असे का ? 50 हजार लिटर ते 01 लाख लिटर क्षमतेचा "सर्ज टँक " उभे करावे लागणार आहे त्यावर सुद्धा प्रशासन मूग गिळुन बसले आहे. कॉफर डॅम चे अंतिम नियोजन काय आहे ते जाहीर करा, जायकवाडी ते शेवटच्या पाणी वापरणाऱ्या ग्राहका पर्यंत टाकण्यात येणाऱ्या प्रत्येक व्यासाच्या पाईपची हायड्रॉलिक तपासणी होणार आहे की नाही ? हे प्रशासना कडून स्पष्ट का होत नाही ? हे सर्व होण्या आधीच कंत्राट दाराचे देयके देण्याची घाई प्रशासन का करत आहे ? यावर सुद्धा प्रशासनाने बोलले पाहिजे ? शहराच्या पाणी पुरवठ्या बाबत गांधी भवन समर्थनगर येथे जन आंदोलन विकास कृती समिती महाराष्ट्र आणि पीपल्स फोरम फॉर सोशल कॉज च्या वतीने आयोजीत भव्य पत्रकार परिषदेत अध्यक्ष जेष्ठ जल अभ्यासक डॉ. राजेंद्र दाते पाटील अनेक बाबी उजागर केल्या आहेत.
या पत्रकार परिषदेस प्रा.मनोहर लोंढे, प्रा.डॉ.मच्छिंद्र गोर्डे, विजय (गुड्डू )निकाळजे, अमित वाहुळ आदी उपस्थित होते. 17 हजार पेक्षा जास्त पाणीपट्टी टप्या टप्प्याने नागरीकांना भरावी लागणार होती.
मनपा प्रशासनाने आता तरी सर्व सत्यता नागरिकांची समोर आणली पाहीजे. छत्रपती संभाजीनगर शहरासाठी नवीन पाणी पुरवठा योजना साठी केंद्राने 45 टक्के राज्याने 25 टक्के असे मिळुन 70 टक्के तर मनपाचा हिस्सा 30 टक्के असणार आहे.
आमच्या प्रयत्नामुळे रू.2025 आहे. 2014 या वर्षा पर्यंत वर्षाला पाणीपट्टी साधारणता 1800 रुपये एवढी होती. समांतर योजने साठी राज्य शासनाने पाणी पुरवठा उपविधी अंमलात आणली यातील नियमा प्रमाणे पाणी करत साधारणता प्रति वर्षी वर्षी दहा टक्के वाढ केली जाऊ लागली. आम्ही स्वतः खुप ओरड केली आंदोलन केली तेव्हा शब्दछल करून प्रतिवर्ष 10% ऐवजी दर तीन वर्षाला 25 % वाढ असे ठराव मनपात घेतला गेला तत्कालीन पालक मंत्री श्री सुभाष देसाई यांना आमचे शिष्य मंडळ भेटले व वस्तू स्थिती सांगितल्यावर योजना पुर्ण होई पर्यंत सरसगट 50% कमी करून 2025 रुपये पाणी पट्टी घेण्याचे ठरले जे आज तगायत आहे. पण योजना पुर्ण झाली की मूळ 4,050 रुपयांवर 10% मीटर सुरूच राहणार आहे. त्यातील तरतुदी बेमालूम पणे घुसल्या गेल्या असुन ही पाणी पट्टी नसुन पुरविणाऱ्या सेवेसाठी प्रतिवर्षाचा कर आहे असे सांगितले आहे.
म्हणून जनहितार्थ प्रमुख मागण्या...
राज्य शासनाने त्यांची पाणी पुरवठा उपविधी 2011 तात्काळ रद्द करावी- 4050 रू. पाणी पट्टी ही योजना कार्यान्वित होताच सुरू करणार असुन पाणी मिटर लावणे असा छुपा डाव तात्काळ जनहितार्थ रद्द करावा-छुपा अजेंडा जोअक्षरशः उघडा पडला आहे त्याच्या अंमल बजावणीचा विचार सोडुन द्यावा- मार्गस्थ ग्राहकांना शहर वासीयांच्या पाण्यामधुन सर्रास पाणी दिल्या जाते ते तात्काळ बंद करावे- शासनाने नियुक्त करावयाच्या जागेवर मनपाचा अभियंता नियुक्त करू नये. विद्युत पुरवठा खंडित झाल्यास पाण्याचा दाब नियंत्रित ठेवण्यासाठी 2500 मिमी व्यासाची जलवाहीनी फुटल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे त्यासाठी सर्ज टँक उभे करावेत. मनपास स्व:हिस्सा भरण्यासाठी 822 कोटी 22 लाख रूपये द्यायचा आहे.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, तो एचडीसी कडून कर्ज रूपाने देण्याचा शासनाचा मानस असुन हे कर्ज परतावा किमान बीन व्याजी 5 वर्षानंतर परतफेड करायची सवलत द्यावी. शहरात साधारणतः 1900 कि.मी.पाईप लाईन टाकावी लागणार असुन सद्यस्थितीत फक्त 1080 कि.मी.काम दृष्टी क्षेपात असुन पुढील काळात 800 कि.मी पेक्षा ही जास्त पाईप लाईन टाकावी लागणार आहे त्याचे नियोजन जनहितार्थ तात्काळ जाहीर करावे.-नविन बांधावयाच्या 56 टाक्या पैकी केवळ 3 टाक्या हस्तांतरित झाल्या असुन काही टाक्यांच्या कामांना स्थगिती देण्यात आलेली असुन यासर्व बाबींचा खुलासा करावा-फक्त 3 टाक्यांच्या भरोशावर 32 लाख लोकांना पाणी कसे पुरविल्या जाईल ? हा महत्वाचा खुलासा प्रशासनाने तात्काळ करावा. सद्य परिस्थितीचे अवलोकन करता केवळ 28 टाक्यांचे काम पिलर व स्लॅब या मर्यादे पर्यंत आलेले असुन 1680 कोटींची राज्य शासनाने मंजूर केलेल्या योजनेची किंमत होती. या योजनेसाठी वाढलेल्या 160 कोटीं बाबत डोके दुःखी वाढली त्याचे नियोजन जनहितार्थ जाहीर करा, पहिल्या टप्प्या मधील कामांत समाविष्ट असलेले ."जॅकवेल " चे काम पूर्णत्वास गेल्या शिवाय या योजने तील दुसऱ्या टप्प्यातील कामांना सुरवात होऊ शकत नाही ते कसे याचा जनहितार्थ खुलासा व्हावा-गेली अनेक वर्ष आमची मागणी असुन एक सखोल चौकशी करणारी उच्चाधिकार चौकशी समिती नेमावी (एचपीसी ) व दोषीवर तात्काळ कारवाई करावी अशी ही मागणी जन आंदोलन विकास कृती समिती महाराष्ट्र अध्यक्ष आणि पीपल्स फोरम फॉर सोशल कॉज च्या वतीने आयोजीत भव्य पत्रकार परिषदेत अध्यक्ष जेष्ठ जल अभ्यासक डॉ राजेंद्र दाते पाटील यांनी केली आहे.
पुढे ते म्हणाले की वरील प्रमुख त्रुटी कोणी निर्माण केली ती जवाबदारी निश्चीत करावी अशीही मागणी त्यांनी केली आहे.
आता पाणी पुरवठा नियोजन करता येईल काय ?
अगदी जायकवाडी पासुन पाईप लाईन नागमोडी टाकली आहे. ती सरळ करून नाही घेतली तर पाण्याच्या दबावा मुळे सतत पाईप लाईन फुटत राहील व पाणीपुरवठा नियोजन करणे अत्यंत जिकिरीचे होणार आहे चुकीच्या पाईप लाईन अंथरल्या गेल्यास भविष्यात हा सततचा त्रास मनपास होणार असुन तांत्रीक दृष्ट्या अयोग्य अंथरलेली पाईप लाईन ताब्यात घेण्याची जनविरोधी कारवाई मनपाने करू नये. या जलवाहिन्या भविष्यात फुटत राहिली तर त्यावेळी मनपाचे जे अभियंते काम करतील त्यांना सस्पेंड व्हायची वेळ येईल आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण काम पूर्ण करून निघून जाईल. 2500 एमएमची पाईप लाईनचे काम संपुर्ण पणे संपून ती समाधानकारक टेस्टींग नंतर पूर्णतः सुरू होत नाही तो पर्यंत तात्पुरती पाणी पुरवठा व्यवस्था म्हणुन 900 एमएमच्या लाईनचा पर्याय आम्ही स्वतः पुढे आणला होता व त्यासाठी आवश्यक असणारा निधी मिळावा म्हणुन सतत पाठपुरावा आम्ही केल्याचे सर्वश्रुत आहे त्यामुळे 900 एम एम ची लाईन तांत्रीक दृष्ट्या अधिक सक्षम करून घेणे अत्यावश्यक आहे. यात आज पर्यंत वॉटर ट्रीटमेंट प्लांट अद्यापही संपलेले नाही. वास्तावीक पाहता 900 एम एम लाईन मधुन 75 एम एल डी पाणी पुरवठा होणे अपेक्षित असुन त्यासाठी घेते ? याचे उत्तर कोण देणार ? एकच मोटार बसवलेली आहे आणि आश्चर्य म्हणजे या मोटारीवर मीटरच नाही. मग पाणी किती येते याचे मोजमाप मनपा कसे करणार ? आता या सगळ्याच लाईनचे गौड बंगाल असे आहे की, जुनी 700 एम एम लाईन आणि जुनी 1200 एम एम लाईन ला चिकटून ही पाईप लाईन अगदी नागमोडी टाकली जात असल्याने ती एक तर सरळ रेषेत अलाईनमेंट नाही आणि म्हणुन पाण्याच्या दबावा मुळे ती लाईन सतत फुटणार आहे. याची जवाबदारी कोणाची असेल ? हे सुद्धा निश्चीत करणे गरजेचे आहे. जुन्या 700 एम एम लाईन आणि जुन्या 1200 एम एम लाईन मधुन फक्त 125 एम एल डी पाणी मिळते आणि आमच्या सूचनेवर गांभीर्याने कारवाई केल्यास 125 अधिक 75 एम एल डी असे किमान 200 एम एल डी पाणी मिळू शकते त्यात सद्य स्थितित मुख्य तांत्रीक अडचण ही आहे की, येऊ घातलेले हे पाणी कुठे साठवणार ? शेवटच्या नळ धारक ग्राहकास ते मनपा कसे पुरवणार ? याचे मनपा कडे उत्तरच नाही ? सगळा ढिसाळ कारभार सुरु आहे. काही एक नियोजन नाही. फिल्टर टँक म्हणजे जल शुद्धीकरण तात्काळ सुरु करून तिन्ही पंप चालु केल्या शिवाय पर्याय नाही अशीही मागणी जन आंदोलन विकास कृती समिती महाराष्ट्र चे अध्यक्ष आणि पीपल्स फोरम फॉर सोशल कॉज चे सचिव जेष्ठ जल अभ्यासक डॉ राजेंद्र दाते पाटील यांनी या भव्य पत्रकार परिषदेत केली आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            