एकनाथ खडसे यांना ह्रदयविकाराचा झटका, प्रकृती स्थिर, मुंबईत हलवणार
 
                                एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका, प्रकृती स्थिर
एअर अॅम्ब्युलन्सने उशिरा रात्री आणणार मुंबईत...
जळगाव,दि.5(डि-24 न्यूज) माजीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी-शरद पवार गट) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना रविवारी दुपारी हृदयविकाराचा झटका आला. सध्या जळगाव येथील गजानन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार त्यांना जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे आमदार खडसे यांच्या उपचारासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने एअर अॅम्ब्युलन्सची व्यवस्था करण्याचे निर्देश दिल्याचे वृत्त आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे यांनी वडिलांची प्रकृती खालावल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने एअर अॅम्ब्युलन्सची व्यवस्था केली. त्यामुळे खडसे यांना तत्काळ जळगावहून मुंबईत उपचारासाठी आणण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री शिंदे हे सध्या साताऱ्यातील दरे या गावी आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्याच्या प्रकृतीची माहिती मिळताच त्यांनी तातडीने एअर अॅम्ब्युलन्सची व्यवस्था केली. खडसेंना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. सध्या डॉक्टरांचे पथक त्याच्यावर लक्ष ठेवून आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            