एनडीए सरकारचा शपथविधी संपन्न, भाजपाचा शहरात जल्लोष...! मराठवाड्याला एकही मंत्रीपद नाही
 
                                भाजपा तर्फे शहरात जोरदार जल्लोष
पूर्व मतदार संघात आनंद साजरा.. मराठवाड्यातून एकही मंत्रीपद नाही... डॉ भागवत कराड यांनाही डच्चू
क्रांतीचौकात भाजपा शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी शपथविधीसाठी मोठे एलइडी स्क्रीन लावले. येथे कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला, भडकलगेट येथे आरपिआई आठवले गटाकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जल्लोष साजरा करण्यात आला... मराठवाड्यात एकही मंत्री नाही याबद्दल नाराजी...
औरंगाबाद, दि.9(डि-24 न्यूज ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्ली येथील राष्ट्रपती भवन येथे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ विधी पार पडला. त्यांनी शपथ घेताच राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे यांच्या नेतृत्वात त्यांच्या कार्यालया समोर जोरदार जल्लोष करण्यात आला.
लोकसभेत भारतीय जनता पक्ष आणि इतर घटक पक्षांना देशातील जनतेने प्रचंड प्रतिसाद दिल्याने. पंतप्रानपदासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची सूत्र सोपवली. मागील 10 वर्षात केलेल्या त्यांच्या कामावर विश्वास ठेवत जनतेने पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या गळ्यात पंतप्रधान पदाची माळ घातली. आज दिल्लीत राष्ट्रपती तसेच इतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत नरेंद्र मोदी यांनी शपथ घेत पंतप्रधान पदाचा तिसरा कार्यकाळ सुरू केला आहे.
याचा आनंद साजरा करण्यासाठी राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने पूर्व मतदार संघातील त्यांच्या पुंडलिक नगर, बजरंग चौक आणि कैलास नगर येथे भव्य असे जल्लोष साजरा करण्यात आला. नागरीकांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची उपस्थि
 
 
 
ती होती.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            