एमआयएमला सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडीत चर्चा नाही - अंबादास दानवे

एमआयएमला सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडीत चर्चा नाही - अंबादास दानवे
छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज) आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत एमआयएम जाण्यासाठी इच्छुक आहेत. महाविकास आघाडीने लवकर बैठकीत चर्चा करुन तात्काळ कळवावे नसता एमआयएम एकला चलो रे ची भुमिका घेणार आहे असा अल्टिमेटम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिला होता. महाविकास आघाडीचे उमेदवार पडले तर आरोप प्रत्यारोप करायचे नाही असाही इशारा त्यांनी दिला होता. आज पत्रकार परिषदेत शिवसेना(उबाठा) गटाचे नेते तथा विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांना डि-24 न्यूजने प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले आतापर्यंत महाविकास आघाडीत एमआयएमला सोबत घेण्यासाठी बैठकीत चर्चा झाली नाही. शिवसेनेसोबत घेण्याचा प्रश्नच नाही असे उत्तर दानवेंनी दिल्याने एमआयएमला आता आपला निर्णय घ्यावा लागेल असे दिसत आहे.
औरंगाबाद मध्य, भायखळा व मालेगाव या मतदारसंघातून मुस्लिम अल्पसंख्याक उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे हा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले शिवसेना (उबाठा) जात धर्म बघून उमेदवारी देत नाही. मेरीटवर उमेदवारी दिली जाईल. तो उमेदवार कोणत्या जातीचा धर्माचा बघितले जाणार नाही. शिवसेनेने साबिर शेख यांना मंत्री केले होते. विधानसभा असो किंवा विधानपरिषद अल्पसंख्याक समाजाला स्थान दिले जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले. मराठवाड्यात 1995 साली शिवसेनेच्या 14 जागा निवडून आल्या होत्या. किती जागा मिळतील याला महत्त्व नाही तर याहून जास्त जागा निवडून आणण्याचा आमचा संकल्प आहे. मशाल चिन्ह घरा घरात पोहोचले आहे लोक निवडणूक कधी जाहीर होते याची अपेक्षा करत आहे असे दानवेंनी सांगितले.
What's Your Reaction?






