ऑटोरिक्षाच्या संपामुळे स्मार्ट सिटी बसचे उत्पन्न दुप्पट, 75 हजार प्रवाशांनी केला प्रवास

 0
ऑटोरिक्षाच्या संपामुळे स्मार्ट सिटी बसचे उत्पन्न दुप्पट, 75 हजार प्रवाशांनी केला प्रवास

रिक्षा संपामुळे स्मार्ट बसमध्ये दुप्पटपेक्षा जास्त प्रवाशी'

औरंगाबाद, दि.10(डि-24 न्यूज) बुधवारी पुकारलेल्या रिक्षा संपामुळे माझी स्मार्ट बस सेवा नागरिकांसाठी वरदान ठरली. 

शहरात रिक्षा चालकांनी संपात भाग घेतल्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी समस्या उभी राहिली. अशा वेळेस स्मार्ट सिटी अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या माझी स्मार्ट बस अत्यंत फायदेशीर ठरली. सर्व मार्गावर शहर बस भरून चालल्या. 

सकाळच्या पाळीच्या आकडेनुसार शहर बस मध्ये बुधवारी रोजच्या अपेक्षा दुप्पट प्रवाशी संख्या होती.

सकाळच्या शिफ्ट मध्ये एकूण 11,944 किलोमीटरवर 514 फेऱ्या झाल्या आणि त्यात 35599 प्रवासी होते. दुपारपर्यंत Rs 1007109 रुपये येवढं एकूण उत्पन्न झाला होता. 

दिवसभरात शहर बस सेवेत 75,000 प्रवाशी संख्या होईल अशी अपेक्षा आहे. तसे सरासरी दररोज शहर बस मध्ये 30,000 प्रवासी असतात. म्हणून बुधवारी ही संख्या दुप्पट पेक्षा जास्त होती, संजय सुपेकर , शहर बस विभागाचे मुख्य चालन व्यवस्थापक ह्यांनी ही माहिती दिली. 

मनपा आयुक्त तथा प्रशासक व स्मार्ट सिटीचे सीईओ जी श्रीकांत ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आज संपूर्ण शहर बस विभाग रस्त्यावर बसेसचा व्यवस्थापन बघत होता. त्यामुळे वाढीव प्रवशांना सुविधा देण्यासाठी मदत मिळाली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow