ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर सरकार कोसळेल- मंत्री छगन भुजबळ

 0
ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर सरकार कोसळेल- मंत्री छगन भुजबळ

ओबीसी आरक्षणाला धक्का लावला तर सरकार कोसळेल- मंत्री छगन भुजबळ 

मंत्री भुजबळ यांचा सरकारला कडक शब्दात इशारा...

औरंगाबाद,दि.6 (डि-24 न्यूज) प्रत्येक जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र देण्याचे कार्यालये थाटून मराठ्यांना कुणबी ठरवून सरसकट आरक्षण देण्याचा घाट सरकारने घातला तर बहुजन समाजातल्या 375 जातीवरचा तो कठोर आघात ठरणार आहे, याविरुद्ध बहुजन समाजात असंतोष होईल अशा शब्दात सरकारवर घणाघात करत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसींच्या आरक्षणाला हात लावला तर सरकार जाणार असा इशारा भरगच्च पत्रकार परिषदेत दिला.

मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आमचा विरोध नाही परंतु सरसकट कुणबीचे प्रमाणपत्र देण्यास विरोध आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण सरकारने द्यावे आमची हरकत नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर सर्व राजकीय पक्षांनी लक्षात ठेवा. आम्ही पण मतदार आहेत. ओबीसी समाज शांत आहे पण विचार करत आहे. आमच्या हक्काचे आरक्षणाला धक्का लागला तर सरकार कोसळेल-असा इशारा आपल्याच सरकारला त्यांनी दिला आहे. निजामकालीन नोंदी कुणबी आहे तर त्यांना जातीचा दाखला देण्यास हरकत नाही. असे त्यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणावरून बीड आणि माजलगाव येथे आंदोलकांनी जो हिंसाचार केल लोकप्रतिनिधींची घरे जाळली. भुजबळ यांनी या भागाचे आज दौरा करून पाहणी केली. औरंगाबाद येथे एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पत्रकारांशी बोलताना ते कमालीचे आक्रमक दिसले.

सुमारे 700 -800 लोकांच्या जमावांनी हातात कुऱ्हाडी, लोखंडी पहार पेट्रोल बॉम्ब घेऊन बहुजन समाजातील नेत्यांना लक्ष्य बनवत त्यांची घरे पेटवली. समता परिषदेचा आमचा कार्यकर्ता सुभाष राऊत केवळ माळी समाजाचा असल्याने त्याची सनराईज हॉटेल 400 -500 लोकांनी जाळून टाकली. हल्लेखोर सुभाष राऊत कुठे आहे असे ओरडत त्याला शोधत होते. जर ते सापडले असते तर त्यांचा खून केला असता, प्रकाश सोळुंके हे तेली समाजाचे असल्याने त्यांचेही घर जाळले. घराची टाईल्स उखडून टाकण्यात आली. घराची राखरांगोळी करण्यात आली. आंदोलकांचा हा धिंगाणा जवळपास तासभर सुरू होता. तेथील एसपींना फोन करून संरक्षण द्या असे सांगितले मात्र पोलीस काहीही करू शकले नाही. आमदार संदीप क्षीरसागर यांची दोन-तीन माळ्याची इमारत, जयवंत क्षीरसागर यांचे घर बेचिराख करण्यात आले. ओबीसी समाजावरचा हा ठरवून केलेला हल्ला होता असे ते म्हणाले.

मी किंवा माझ्या पक्षाने मराठा आरक्षणाचा विरोध केला नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण द्यावे अशी मागणी आहे. जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी सुध्दा त्यांनी यावेळी केली. कोणत्या समाजाची लोकसंख्या किती हे पण यामुळे निष्पन्न होईल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow