ओबीसी विरुद्ध मराठा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न, बीड जाळपोळीच्या घटनेत प्रोफेशनल लोक...!
ओबीसी विरूद्ध मराठा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न, प्रोफेशनल लोक बीडची घटनेत
औरंगाबाद, दि.8(डि-24 न्यूज) हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करुन भांडणे लावण्यात यश मिळत नसल्याने राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा वाद निर्माण करुन राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू आहे असा गंभीर आरोप सरकारवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी लावले आहेत.
मराठा समाजाला टिकणारे आरक्षण सरकारने मिळवून द्यावे त्यासाठी सक्षम कायदा बनवावा. ते आरक्षण न्यायालयात टिकले पाहिजे. पण हे आरक्षण ओबीसीतून मिळायला हवे की नाही हे बोलण्यास पवारांनी बगल दिली.
युवा संघर्ष यात्रेचे नियोजन करण्यासाठी शहरात त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
त्यांनी बीडच्या जाळपोळीच्या घटनेवर मोठा गौप्यस्फोट करुन पोलिसांवरच संशय व्यक्त केला आहे. जेव्हा जाळपोळ होत होती ओबीसी नेत्यांची घरे जेव्हा जाळली जात होती त्या घटनेकडे बघितले तर असे दिसून येत आहे प्रोफेशनल पध्दतीने हा हल्ला करण्यात आला. यामध्ये तीन टीम काम करत होत्या. एक टोळी आपल्या अचूक निशाण्याने सीसीटीव्ही कॅमेरे फोडत होती. दुसरी टीम कोणी जाळपोळीचे आपल्या मोबाईलवर व्हिडिओ बनवत असेल तर त्यांचे मोबाईल हिसकावून फोडत होती. तिसरी टीमकडे पेट्रोल बाॅम्ब, फाॅसफरस बाॅम्ब व दगडफेक करत होती. गाड्यांमध्ये एकाच प्रकारची दगड जमवलेली होती. जे घर जाळायचे त्या घराला नंबरने ते बोलायचे जे हल्लेखोर या घटनेत जखमी होतील त्यांना घेऊन जाण्यासाठी तेथे स्वतंत्र रुग्णावाहिका उभी होती त्यांना ते कोठे घेऊन जात दिसत नव्हते. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घराजवळच पोलिसांचे मुख्यालय आहे तेथे नेहमी शंभर दोनशे पोलिस तैनात असतात पण जेव्हा जाळपोळ सुरू होती ते पोलिस कोठे होती हा प्रश्न विचारला जात आहे. सहा तास हि जाळपोळ सुरू होती मग यावेळी घटना थांबवण्यासाठी पोलिस आली का नाही...असा सवाल आमचा आहे. ते हल्लेखोर मोबाईलवर कोड वर्ड भाषेत कोणाशी काय बोलत होते हे पण चौकशीचा भाग आहे. जे तरुण दूर उभे राहुन घटना बघत होते त्यांचा या घटनेशी संबंध नाही अशा मराठा समाजाच्या तरुणांची धरपकड सुरू आहे हे चुकीचे आहे. ज्या समाजकंटकांनी हि घटना घडवून आणली त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
राज्यातील विविध प्रश्नांबाबत 17 नोव्हेंबर दिवाळीनंतर युवा संघर्ष यात्रा पुन्हा सुरू करणार आहे. दिवाळी विविध गावांमध्ये कुटुंबासह साजरी करणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. युवकांच्या प्रमुख मागण्या घेऊन हि युवा संघर्ष यात्रा दिवाळीनंतर जामखेड तालुक्यातून सुरू होणार आहे. हि यात्रा पायी नागपूर येथे 12 डिसेंबर पर्यंत जाईल. शासकीय पदभरती व रोजगार, औद्योगिक विकास व गुंतवणूक, कृषी, शेतकरी आत्महत्या रोखने, शिक्षण व कौशल्य विकास, महीला सुरक्षा, आरोग्य, मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आरक्षण, जातीनिहाय जनगणना, युवा आयोगाची स्थापना, क्रीडा विभागाचे सक्षमीकरण व होतकरू खेळाडूंना संधी देने या विविध मागणीसाठी युवा संघर्ष यात्रा सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुस्लिम विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी सवलत मिळावी यासाठी मार्टीची स्थापना करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पवार म्हणाले.
यावेळी जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन व पदाधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?