ओवेसींनी पाकीस्तानला ठणकावले, वक्फ संशोधन कायद्याच्या विरोधात देशव्यापी बत्तीगुल आंदोलन होणार
 
                                ओवेसींनी पाकीस्तानला ठणकावले, वक्फ संशोधन कायद्याच्या विरोधात देशव्यापी बत्तीगुल आंदोलन
आतंकवादच्या विरोधात सरकारने कडक कारवाई केली पाहिजे आम्ही सरकारसोबत आहोत, ओवेसींचे विधान
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.28(डि-24 न्यूज) पाकीस्तानात बलुचिस्तान व अनेक समस्या आहेत ते सोडवणे दुर तर आतंकवाद्यांना पोसने व ट्रेनिंग देण्याचे नापाक काम ते करत आहे. भारताच्या मुकाबल्यात पाकीस्तान 30 वर्ष मागे आहे आपली औकात नसताना भारताला डोळे दाखवण्याचा प्रयत्न करु नये. 26/11 च्या एक आरोपी तुरुंगात असताना त्याची मुले जन्माला येत आहे असले कृत्य पाकीस्तानात सुरू आहे. बिलावल भुट्टो यांनी बालपणासारखे वक्तव्य करु नये त्यांच्या आई व आजोबासोबत काय घडले होते ते अगोदर बघावे. त्याच आतंकवाद्यांनी आईला मारले आणि तेच भुट्टो पाणी बंद झाले तर रक्ताचे पाट वाहतील असे वक्तव्य करणे योग्य नाही. असे प्रत्यूत्तर देत एमआयएमचे सुप्रीमो तथा खासदार असदोद्दीन ओवेसी यांनी पाकीस्तानला ठणकावले.
ते आज शहरात ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना बोलत होते.
त्यांनी पुढे सांगितले देशभरात वक्फ संशोधन कायदा सरकारने रद्द करावा या विरोधात ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या वतीने शांततेत आंदोलन केले जात आहे. विविध प्रकारचे आंदोलन 6 जून पर्यंत केले जाणार आहे. 30 एप्रिल रोजी रात्री 9 ते 9.15 वाजेपर्यंत देशव्यापी बत्तीगुल आंदोलन करण्यात येणार आहे. 15 मिनटे घर, दुकाने व इतर स्थापनाचे विज पुरवठा बंद करून या कायद्याचा निषेध करावा असे आवाहन ओवेसींनी केले. पुढे त्यांनी सांगितले परभणी येथे वक्फ संशोधन कायद्याच्या विरोधात भव्य कार्यक्रम घेतला. मालेगाव येथे महीलांच्या वतीने कार्यक्रम आयोजित केला आहे. मानव चेन उभारुन या कायद्याचा विरोध करण्यात येणार आहे. जनजागृती करण्यासाठी टेबल टाॅक चर्चा करण्यात येणार आहे. वक्फ संशोधन कायदा हा मुस्लिम समाजाने वक्फ केलेल्या जमीनी बळकावण्यासाठी आणला गेला आहे. यामध्ये सरकारच्या नितिमत्तेवर आम्हाला शंका आहे. अशी टीका त्यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी बोलताना मिडिया जम्मू काश्मीर येथील नागरिकांच्या विरोधात बोलत आहे ते आपल्या देशातील नागरिक आहेत. जम्मू काश्मीर आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे. या आतंकवादी घटनेमुळे तेथील व्यवसायावर परिणाम झाला आहे. पर्यटनाच्या व्यवसायावर येथील अर्थव्यवस्था अवलंबून आहे.
यावेळी ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉचे अध्यक्ष मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी, प्रवक्ते क्युएसआर इलियास, मौलाना फजल उर रहेमान, मौलाना महेफुजुर्रहमान, मौलाना इलियास फलाही, इंजिनिअर वाजेद कादरी आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            