औरंगाबाद जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद, गृह विभागाचे आदेश
औरंगाबाद जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद, गृह विभागाचे आदेश
औरंगाबाद, दि.1(डि-24 न्यूज) जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलन तीव्र होत आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी म्हणून अफवा सोशल मीडियावर पसरवू नये यासाठी राज्याचे गृह विभागाने आज सकाळी 6 वाजेपासून 3 नोव्हेंबर पर्यंत 48 तासांसाठी इंटरनेट सेवा औरंगाबाद जिल्ह्यात बंद केली आहे.
इंटरनेट सेवा जिल्ह्यातील 9 तालूक्यात असणार आहे यामध्ये औरंगाबाद तालूका, सिल्लोड, सोयगाव, गंगापूर, खुलताबाद, पैठण, वैजापूर, कन्नड, फुलंब्री तालुक्याचा समावेश आहे. गृह विभागाचे एडीशनल चिफ सेक्रेटरी सुजाता सौनिक यांच्या सहीने हे आदेश काढले आहेत याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. इंटरनेट सेवा बंद झाल्याने उद्योग व्यवसायावर परिणाम होत आहे. शहरात इंटरनेट सेवेत व्यत्यय येत असल्याचे तक्रारी येत आहेत.
जिल्ह्यात जमावबंदी आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहे.
.
What's Your Reaction?