औरंगाबाद पश्चिम मधून डॉ.जितेंद्र देहाडे इच्छुक, घेतला काँग्रेसचा अर्ज
औरंगाबाद पश्चिम मधून डॅा.जितेंद्र देहाडे यांचा उमेद्वारी अर्ज
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.9(डि-24 न्यूज)
महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॅा.जितेंद्र देहाडे यांनी औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी कॉंग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळावी यासाठी पक्षाचे शहर अध्यक्ष शेख युसूफ यांच्याकडे उमेदवारी अर्ज सुपूर्द केला आहे. यावेळी पश्चिम ब्लॅाक कॉंग्रेसचे अध्यक्ष उमाकांत खोतकर, मोईन कुरैशी, अनिस पटेल, कैसर बाबा, नरेश पाखरे, इंजी.शिरिष जाधव, साहेबराव बनकर, प्रमोद सदाशिवे, सोनू पाईकडे यांच्यासह पश्चिम ब्लॅाक कॉंग्रेसचे पदाधिकारी व वॅार्ड अध्यक्ष उपस्थित होते.
डॅा.देहाडे हे गेल्या २४ वर्षांपासून कॉंग्रेस पक्षात सक्रिय कार्य करत आहेत. त्यांनी पक्षात विविध पदे भूषवले आहेत. तसेच २०१४ साली त्यांनी औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक देखील लढवली होती. महाविकास आघाडी मधे सदरील मतदारसंघ कॉंग्रेस पक्षाला मिळावा यासाठी पदाधिकारी जोर लावत आहेत.
What's Your Reaction?