कचरा उचलणा-या रेड्डी कंपनीचे कंत्राट रद्द करा, काँग्रेसची आयुक्तांना मागणी
कचरा उचलणा-या रेड्डी कंपनीचे कंत्राट रद्द करा - काँग्रेस शहर जिल्हा काँगेस कमिटी चे अध्यक्ष युसूफ शेख यांची मागणी...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज) शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मनपा तथा प्रशासक आयुक्त जी श्रीकांत यांना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले, महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) ही कचरा राजधानी म्हणून ओळख निर्माण होत आहे
शहरात मुख्य रस्ते, कॉलनी, वस्त्यांनमधे कचर्याचे ढीग पसरले असून शहरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचरा उचलणारी रेडडी कंपनी अक्षरश: नागरीकांच्या आरोग्याशी खेळत आहे. कचरा उचलणा-या रेडडी कंपनीकडे गाडयांचे फिटनेस प्रमाणपत्र नाहीत. जी.पी.एस नाहीत, स्वच्छता निरीक्षकांचे प्रमाणपत्र नाही, ड्रायवरकडे लायसन्स नाहीत, कचरा उचलणा-या कर्मचा-यांकडे मास्क व इतर साहित्य नाहीत त्यामुळे कर्मचा-यांचे आरोग्य कंपनी धोक्यात घालत आहे. वार्डा मध्ये चार ते पाच दिवस घंटा गाडया येत नाहीत. कचरा उचलणा-या गाडया वेळेवर येत नाही. दुर्गंधी मय वातावरण निर्माण झाले आहे. कचरा जमा झाल्यामुळे त्या ठिकाणी कुत्रे येवुन त्यांची झुंड तयार होऊन लहान मुलांच्या अंगावर धावून जातात, अनेक ठिकाणी कच-यामध्ये जनावरे कचरा खातांना दिसत आहे. त्यामध्ये प्लास्टीक खाल्यामुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात आहे. आमचा दावा आहे की सदरील परिस्थिती ही रेड्डी कंपनी मूळे निर्माण झाली आहे.
यामुळे रेड्डी कंपनीचे कचरा संकलनाचे कंत्राट त्वरित रद्द करून सदरील कंपनीला ब्लॅक लिस्टेड करण्यात यावे व कडक करवाई करण्यात यावी नसता ठिकाठिकाणी जमलेला कचरा जमा करुन महानगर पालिकेत आयुक्तांच्या कार्यालयात टाकण्यात येईल. असा इशारा शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ यांनी दिला.
यावेळी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसुफ आदी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?