कन्नड, औट्रम घाटातील टनेल बोगद्याचे काम करावे या मागणीसाठी साखळी उपोषणाला सुरुवात...!

 0
कन्नड, औट्रम घाटातील टनेल बोगद्याचे काम करावे या मागणीसाठी साखळी उपोषणाला सुरुवात...!

कन्नड, औट्रम घाटातील टनेल बोगद्याचे काम करावे या मागणीसाठी साखळी उपोषणाला सुरुवात...!

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.12(डि-24 न्यूज) राष्ट्रीय महामार्ग 52 धुळे-सोलापूर महामार्गाचे काम 2015-16 पासून सुरू झाले असून औट्रम घाटातील टनेल(बोगदा) या 14km काम सोडून सर्व काम पूर्ण झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग सोबत बोगदा काम सुरू झाले असता तर आज बोगद्यासहीत काम पूर्ण झाले असते. हे काम न झाल्याने घाटात नेहमी ट्राफीक जाम होते व अपघात घडतात. हे काम लवकर करण्यासाठी सरकारने निधी उपलब्ध करून द्यावे व गौताळा अभयारण्यात व्याघ्र प्रकल्पाला मंजुरी द्यावी या मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.

औट्रम घाटातील(कन्नड-चाळिसगाव) बोगद्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी अनेकदा मागणी करूनही अनेक वर्षे महामार्गाच्या कामाला झाले तरीही हे काम झाले नाही. महामार्गावरील राज्य रस्ता ओलांडताना शेकडो लोकांचे अपघात होऊन अनेकजण मृत्यूमुखी पडले यासाठी राज्य रस्ता क्राॅसिंगवर गल्ले बोरगाव-देवगाव, कन्नड-अंधानेर-कोळवाडी-जेहुर रस्ता अपघात स्थळावर विनाविलंब उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग करावे. 

गौताळा अभयारण्यात व्याघ्र प्रकल्पाची स्थापना करावी. तसेच गौताळा अभयारण्य पूर्ण सागवान जंगल असल्यामुळे पानगळतीमुळे जंगलात आग लागते. जंगल ओसाड होतात. डोंगरातील तापमान वाढीमुळे वन्यप्राणी शेतवस्तीकडे जाऊन पाळीव प्राण्यांवर हल्ले करतात. रानडुक्कर, वनगाय, कोल्हे, वानर, माकड प्राणी उन्हाळ्यात सावली, लपन व पाणी न मिळाल्याने शेतपिकांचे नुकसान करतात. वाघ, बिबटे या प्राण्यांच्या हल्ल्यात भांबरवाडी येथील ॠषीकेश राठोड या 15 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला तर अंधानेर येथील दिलीप गिरे या मोटारसायकल स्वाराच्या गाडीवर बिबट्याने हल्ला केला. गाय, वासरु, बकरी वर नेहमी हल्ले होतात. गौताळा अभयारण्यात चोहोबाजूंनी(चर) खोदने किंवा तार कंपाऊंड करुन जंगलास सुरक्षित करावे. उन्हाळ्यात हिरवे वृक्ष मोठ्या प्रमाणात लाऊन वन्यप्राण्यांना मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावे. गुजरदरी धरण झाल्यास कन्नड , वैजापूर, नांदगाव तालुक्यातील शंभर गावांना पिण्याच्या पाण्यासोबत सिंचनाचा लाभ होईल या धरणाची क्षमता वाढवल्यास वन्य प्राण्यांना देखील मुबलक पाणी मिळेल. पितळखोरा लेणी, किल्ले अंतूर, गणितज्ञ भास्कराचार्य यांच्या पुरातत्व विभागाने विकास करावा. या प्रमुख मागणीसाठी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.

यावेळी राष्ट्रीय महामार्ग व औरंगाबाद चाळीसगाव नियोजित रेल्वे मार्ग संघर्ष समितिचे अध्यक्ष डॉ.अण्णासाहेब शिंदे, प्रकाश आबा आहेर, अशोकराव दाबके, गोकुळ गोरे, डॉ.सदाशिव पाटील, राजु बेला राठोड व कन्नड तालुका संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow