कन्नड नगरपालिका हद्दीत मोजणीसाठी मालमत्ताधारकांनी सहकार्य करावे - जिल्हाधिकारी

नक्शा प्रकल्पः कन्नड नगरपालिका हद्दीत मोजणीसाठी
मालमत्ताधारकांनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),दि.22 (डि-24 न्यूज)- नक्शा या प्रकल्पाअंतर्गत कन्नड नगरपालिका हद्दीत पथदर्शी प्रकल्प राबविण्यत येत आहे. याअंतर्गत ड्रोनद्वारे जमिनीचे सर्व्हेक्षण झाले आहे. आता मालमत्ताधारकांनी भूमापनासाठी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे
नक्शा या प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. भूमिअभिलेख अधीक्षक विजय वीर, तहसिलदार विद्याधर कडवकर, उप अधीक्षक भुमि अभिलेख कैलास निसाळ, रचना सहा. योगेश सहज, प्रकल्प समन्वयक मनोज पगारे, गणेश उंभरे आदी उपस्थित होते.
कन्नड येथे देशातील पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. ड्रोन मोजणीनंतर भूमापन कामाची सुरुवात होत आहे. त्यासाठी दि.16 रोजी नोटीसीद्वारे नागरिकांना सुचित करण्यात आले आहे. त्यानंतर प्रत्येक मालमत्ताधारकास प्रॉपर्टी कार्ड, सनद दिली जाणार आहे. हे काम 26 डिसेंबर अखेर पूर्ण करावयाचे आहे. त्यासाठी सर्व मोजणी वेळेत पूर्ण करावी असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.
What's Your Reaction?






