कर्तव्यदक्ष एसिपी सागर देशमुख यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार...

 0
कर्तव्यदक्ष एसिपी सागर देशमुख यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार...

कर्तव्यदक्ष एसीपी सागर देशमुख यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 25 (डि-24 न्यूज) :- शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासह कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) सागर देशमुख यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दुबईतून एका आरोपीला अटक करून छत्रपती संभाजीनगर शहरात आणण्याच्या कारवाईत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याने त्यांच्या कामगिरीची विशेष चर्चा होत आहे. गुन्हेगारीला आळा घालणे, कायद्याचे रक्षण करणे तसेच शहरातील शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात.

त्यांच्या या कार्याची दखल घेत समाजसेवक तथा ज्येष्ठ क्राईम रिपोर्टर अलीम बेग यांच्या वतीने एसीपी सागर देशमुख यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी इस्लाम पार्टीचे नेते आरेफ हुसेनी आणि एजाज बेग उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow