काँग्रेसचा मनपा मुख्यालय व स्मार्ट सिटी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा...!
 
                                नियमित व मोफत पाणीपुरवठा, मालमत्ता करावरील व्याज माफ इ. विविध नागरी समस्यासाठी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा महानगरपालिकेवर हल्लाबोल मोर्चा....
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज)
मागील काही वर्षापासून महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट आहे. त्यावर संपूर्णपणे राज्य शासनाचे नियंत्रण आहे. महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळे प्रशासन बिघडले आहे व सामान्य जनता त्रस्त आहे. या बेजबाबदार प्रशासनाविरुद्ध आज शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ यांच्या नेतृत्वाखाली शहरातील महानगरपालिका हद्दीतील सर्व सामान्य जनतेच्या ज्वलंत समस्यांना वाचा फोडण्यासाठी महानगरपालिका मुख्यालयावर हल्लाबोल मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणावर काँग्रेस चे पदाधिकारी, कार्यकर्ते व सामान्य नागरिक उपस्थित होते. मनपा मुख्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर मोर्चा प्रशासक जी श्रीकांत यांना निवेदन देण्यासाठी स्मार्ट सिटी कार्यालयाकडे वळला.
मोर्च्यानंतर मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांना सविस्तर मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये नियमित व मोफत पाणी, मालमत्ता करामध्ये सूट आदी महत्वाचे विषय व समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी काँग्रेसचे प्रभारी आ.राजेश राठोड, शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ, भाऊसाहेब जगताप, प्रदेश महासचिव डॉ.जफर खान, इकबालसिंग गिल, शेख अथर, अमेर अब्दुल सलीम, अनिस पटेल, इंजि. विशाल बन्सवाल - सरचिटणीस (संघटन व प्रशासन), कैसर बाबा, मसरूर खान, अरुण शिरसाठ, मोईन इनामदार, शफिक शहा, अशोक डोळस, महेंद्र रमंडवाल, इंजिनिअर मोहसीन खान, संजय धर्मरक्षक, सय्यद युनूस, मुद्दसिर अन्सारी, अस्मत खान, पप्पुराज ठुबे, शुभम साळवे, संतोष दीडवाले, प्रकाश सानप, निलेश आंबेडवाडीकर, शेख जमील, इद्रीस नवाब खान, सय्यद युनूस, इंजि. इफ्तेकार शेख, श्रीकृष्ण काकडे, अनिता भंडारी, मुज्जफर खान, प्रमोद सदाशिवे, शेख मोईन हर्सूलकर, चंद्रप्रभा खंदारे, शकुंतला साबळे, सीमाताई मदगे, उषा खंडाळे, शेख मोहसीन लकी, निर्मलामाताई सुरडकर, शिलाताई शिरसाठ, इंदुताई खरात, पूनम येवले, सुभाष पांढरे, जकी बेग, मजाज खान यांच्यासह मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हो
 
ते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            