काँग्रेसच्या पाणीबाणी आंदोलनाने शहराचे लक्ष वेधले, पाणी नाही तर कर नाही....

काँग्रेसच्या पाणीबाणी आंदोलनाने शहराचे लक्ष वेधले, पाणी नाही तर कर नाहीत बोर्ड झळकावले...
पाणी नाही, तर कर नाही - शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे रोज नियमित पाणी साठी महानगरपालिकेवर जोरदार हल्लाबोल, पाणी बाणी जन आंदोलन....
शहर जिल्हाध्यक्ष मा. शेख युसूफ यांच्या नेतृत्वाखाली आज महानगरपालिके वर जोरदार आंदोलन करण्यात आले....टाळ मृदुंग वाजवत, हातात खाली हंडे घेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला...
छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद), दि.15(डि-24 न्यूज)
मागील 25 वर्षे पेक्षा जास्त काळापासून महानगरपालिकेवर सतत शिवसेना - भाजपा युतीची सत्ता होती, तरीही आज संपूर्ण शहराला, आमच्या माता भगिनींना पाण्यासाठी वन वन फिरावे लागत आगे. ही शरमेची बाब आहे व महायुतीचे मंत्री व नेतेमंडळी आपापल्या मनोरंजन व आलिशान गाड्यांमध्ये फिरताहेत. महायुतीच्या भोंगळ कारभारामुळे या शहराला मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागते आहे. मला खात्री आहे की या वेळेस शहराची सर्व सामान्य जनता महायुतीच्या नेत्यांना वॉर्डा-वार्डात फिरू देणार नाही, कारण यांना आता येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत मत मागायचे नैतिक अधिकार राहिले नाही व जनता यांना नक्कीच धडा शिकवणार, असा विश्वास यावेळी शहर जिल्हाध्यक्ष शेख युसुफ यांनी व्यक्त केला.
यावेळी मनपा मुख्यालयासमोर काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते हातात फलक, झेंडे, प्रतिकात्मक हांडे घेऊन जोरदार घोषणा देत - नो वॉटर, नो टॅक्स, वेक अप श्रीकांत, मनपा प्रशासक - हाय हाय, पाणी बाणी अश्या असंख्य घोषणानी परिसर दनाणून सोडले. यावेळी पाण्यासाठी भारुड इत्यादी कार्यक्रम ठेवण्यात आले होते. व मनपा उपायुक्त यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी शहराला नियमित पाणीपुरवठा न करता मनपा टॅक्स वसुली करत असेल तर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी शी संपर्क करा. असे आवाहन शहर जिल्हाध्यक्ष शेख युसुफ यांनी केले.
यावेळी मा. शेख युसुफ, डॉ. जफर खान, इब्राहिम पठाण, सय्यद आक्रम, ब्लॉक अध्यक्ष भाऊसाहेब जगताप, किशोर तुलशीबागवाले, उमाकांत खोतकर, इक्बालसिंग गिल, आमेर अब्दुल सलिम, शेख अथर, कैसर बाबा, शेख रईस, साहेबराव बनकर, शेख युनूस, डॉ. निलेश आंबेवाडीकर, अनिस पटेल, मोईन इनामदार, कैसर बाबा, डॉ. पवन डोंगरे, अरुण शिरसाठ, ऍड. संदीप पाटील, सागर नागरे, सागर साळुंके, संघठन महासचिव इंजि. विशाल बन्सवाल, मसरूर सोहेल खान, मुज्जफर खान, अभिषेक शिंदे, डॉ.योगेश बहादुरे, कल्याण चव्हाण, राहुल सावंत, गौरव जयस्वाल, प्रकाश सानप, आकाश रगडे, एकनाथ त्रिभुवन, अमेर अब्दुल सलीम, अतिश पितळे, गौरव जैस्वाल, अशोक डोळस, अनिता भंडारी, दिक्षा पवार, दिपाली मिसाळ, पप्पूराज ठुबे, संतोष भिंगारे, हकीम पटेल, शफिक शहा, अब्दुल अझीम, इंजि. मोहसीन, शोएब अब्दुल्ला, शेख फयाझोद्दीन, शिरीष चव्हाण, जकिया बाजी, सृजन गावडे, अस्मत खान, प्रवीण सरपाते, संजय धर्मरक्षक, शेख अमजद, सलीम खान, शेख जमील, शेख फय्याजोद्दीन, शफिक शहा, गुरमीत गिल, राजू मगरे शुभम साळवे, अमजद खान, सोपान मगरे, बाबासाहेब बोरचटे, कांता रणभरे, शिला मगरे, चंद्रप्रभा खंदारे, उषाताई खंडागले, रेखा भुईंगल, पल्लवी मगरे, रत्नाबाई वाघुले, विद्या नरवडे, साक्षी मगरे, सोनल वानखेडे, ज्योती माघाडे, गीता साळवे, रामधन चव्हाण, सोपान मगरे, उमर भाई, राजू भाई, मुक्तार भाई, कैलास जुमडे, मुद्दासर अन्सारी यांच्यासह मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?






