काँग्रेस अल्पसंख्यांक तालूकाध्यक्षपदी शेख मसीउद्दीन

अल्पसंख्यांक जिल्हा काँग्रेस कमिटी खुलताबाद तालुका अध्यक्षपदी शेख मस्सीउद्दीन यांची नियुक्ती
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज) - अल्पसंख्यांक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या खुलताबाद तालुकाध्यक्ष पदी शेख मसिऊद्दीन यांची नियुक्ती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ यांच्या सूचने नुसार अल्पसंख्यांक जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अनिस पटेल यांनी नुकतीच शेख मसीउद्दीन यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी नियुक्तीपत्र देताना अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईन इनामदार, खुलताबाद तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष एडवोकेट अनिल पाटील नरवडे, खुलताबाद शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अब्दुल समद शेख अब्दुल मजीद, सय्यद फराज आलेली, मदन राठोड आदी नियुक्तीपत्र देताना उपस्थित होते.
What's Your Reaction?






