किराडपुरा येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी मदत केंद्रावर गर्दी
 
                                 
किराडपुरा येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी मदत केंद्रावर गर्दी
छ.संभाजीनगर(डि-24 न्यूज) किराडपूरा-अल्तमश काॅलनी येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे अर्ज भरण्यासाठी काँग्रेसचे नेते तथा माजी नगरसेवक इब्राहिम पटेल यांनी सुरू केलेल्या मदत केंद्रावर महीलांची गर्दी होत आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मदत केली जात आहे. मोफत अर्ज भरण्याची सोय येथे केली आहे. कोणत्याही दलालांना पैसे न देता येथे अर्ज भरावे. आतापर्यंत मदत केंद्रावर 3 हजार अर्ज आले आहे. संगणकावर लाभार्थ्यांना समोर अर्ज भरले जात आहे . ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर संबंधित विभागाकडे हे अर्ज जमा केले जाणार आहे. जास्तीत जास्त महीलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन इब्राहिम पटेल यांनी केले आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            