केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा जिल्हा दौरा
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा जिल्हा दौरा
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.26 (डि-24 न्यूज) :- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री भारत सरकार नितीन गडकरी हे शुक्रवार, दि.27 सप्टेंबर, 2024 रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
शुक्रवार, दि.27 सप्टेंबर, 2024 रोजी सकाळी 10.15 वा. मुंबई विमानतळ येथून विशेष विमानाने छत्रपती संभाजीनगर विमानतळाकडे प्रयाण.
10.45 वा. छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे आगमन.
10.50 वा. छत्रपती संभाजीनगर विभागातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा आढावा
11.15 वा. छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथून मोटारीने कार्यक्रमस्थळी प्रयाण.
11.25 वा. कार्यक्रमस्थळी आगमन.
11.30 वा. ते दुपारी 01.00 वा. राजस्थानचे राज्यपाल माननीय हरिभाऊ बागडे यांचा अभिष्टचिंतन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : श्री.रामचंद्र मंदिर (मठ) बालाजी ट्रस्ट मैदान, केंब्रिज शाळेजवळ, छत्रपती संभाजीनगर).
01.00 वा. राजस्थानचे माननीय राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या निवासस्थानाकडे मोटारीने प्रयाण.
01.20 वा. राजस्थानचे राज्यपाल माननीय हरिभाऊ बागडे यांच्या निवासस्थानी आगमन.
01.20 ते 2.00 वा. पर्यंत राखीव (स्थळ : शुभदायोग, प्लॉट नं.16, एन-4, सिडको, हॉटेल पालखी जवळ, छत्रपती संभाजीनगर)
02.00 वा. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या निवासस्थान येथून छत्रपती संभाजीनगर विमानतळाकडे मोटारीने प्रयाण.
02.10 वा. छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे आगमन.
02.15 वा. छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथून विशेष विमानाने मुंबईकडे प्रयाण.
What's Your Reaction?