खर्च करण्यात भुमरे आघाडीवर, इम्तियाज जलील दुसऱ्या क्रमांकावर तर खैरे तिसऱ्या क्रमांकावर
निवडणुकीत खर्च करण्यात भुमरे आघाडीवर, इम्तियाज जलील दुसऱ्या क्रमांकावर तर खैरे तिसऱ्या क्रमांकावर...
औरंगाबाद, दि.12(डि-24 न्यूज)
उद्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. त्यापूर्वी उमेदवारी दाखल झाल्यापासून ते मतदानापर्यंत किती खर्च केला ? त्याचा तपशील सादर करावा लागतो. त्यानुसार एकूण 37 उमेदवारांनी आपल्या खर्चाचा तपशील सादर केला आहे.
या तपशीलानुसार या मतदारसंघात सर्वाधिक खर्च हा महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी केला आहे. दुसऱ्या क्रमांकावर एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील हे आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे आहेत. चौथ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार डॉ.जीवन राजपूत खर्च करण्यात पाचव्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसरखान आहेत.
कुणी किती केला खर्च ?
संदिपान भुमरे : 29,72,321 रुपये
इम्तियाज जलील : 16,15, 275 रूपये.
चंद्रकांत खैरे : 12,85,633 रुपये.
डॉ. जीवन राजपूत : 11,60,499 रुपये.
अफसर खान 9,87,264 रूपये खर्च केले आहेत. अपक्ष उमेदवार जे.के.जाधव यांनी 8,35,246 रुपये खर्च केले आहेत. अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी 3,41,156 रुपये खर्च केले आहेत.
What's Your Reaction?