खुलताबादचे नाव बदलण्याची शिवसेनेची जुनी मागणी, नामांतर झाले तरीही श्रेय आमचेच- चंद्रकांत खैरे

खुलताबादचे नाव बदलण्याची शिवसेनेची जुनी मागणी - चंद्रकांत खैरे
उबाठाने रत्नपूर नाव बदलण्यासाठी दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज) बाळासाहेब ठाकरे यांनी 1988 साली औरंगाबादचे संभाजीनगर व खुलताबादचे नामांतर रत्नपूर करण्याची मागणी केली होती. शिवसेनेची हि सर्वात जुनी मागणी आहे. पूर्वीपासून शिवसैनिक रत्नपूरचाच उल्लेख करतात. भाजपाचे 13 दिवसांपासून झालेले आमदार संजय केनेकर यांच्याकडे काही मुद्दे नाही. म्हणून हि मागणी घेऊन ते पुढे आले आहे. भाजपा नामांतरावर राजकारण करत आहे. सरकारने लवकरात लवकर मंत्रीमंडळात खुलताबादचे नामांतर करण्याचा निर्णय घ्यावा. या मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकारी यांना दिले आहे. नामांतराचा निर्णय झाला तरीही शिवसेना(उबाठा) चे श्रेय असणार आहे भाजपाचे नाही असे म्हणत त्यांनी भाजपाला डिचवले.
त्यांनी खुलताबादच्या नावाचा इतिहास सांगितला ते म्हणाले प्रभु रामचंद्र यांचे राज्य होते तेव्हा याचे नाव भद्रावती नगर होते. त्यानंतर रत्नपूर होते. यानंतर औरंगजेबाचे राज्य असताना पुन्हा खुलताबाद नाव ठेवण्यात आले होते.
What's Your Reaction?






