गँगवाॅर विरुध्द शहर पोलिसांची कडक कारवाई, गोळीबार करणाऱ्या आरोपींची काढली धिंड...!

 0
गँगवाॅर विरुध्द शहर पोलिसांची कडक कारवाई, गोळीबार करणाऱ्या आरोपींची काढली धिंड...!

गँगवाॅर विरुध्द शहर पोलिसांची कडक कारवाई, गोळीबार करणाऱ्या आरोपींची काढली धिंड...!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज) - दोन दिवसांपूर्वी हनुमान नगर चौकात गोळीबार करुन दहशत माजवणा-यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गँगवाॅर नंतर पोलिसांनी आरोपिंना धडा शिकविण्यासाठी आज पुंडलिकनगर भागात धिंड काढली. गोळीबार करणाऱ्या मुख्य आरोपी पवन दिवेकर सह टोळीची वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भंडारी यांच्या प्रमुख उपस्थितीत धिंड काढली. यामध्ये आरोपी पवन दिवेकर, कुणाल साळवे, महेश साळवे, रोहन दिवेकर, सतीश हिवराळे, सिध्दांत चाबुकस्वार यांना रस्त्यावर पाई फिरवून गुन्हेगारांच्या गुन्हेगारीला आता थारा नाही धाक फक्त कायद्याचा असा संदेश शहर पोलिसांनी दिला आहे. यावेळी बघ्यांची गर्दी झाली होती. आरोपीला तपासकामी घटनास्थळी आणले असल्याची माहिती भंडारी यांनी दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow