गांजाची तस्करी करण्यासाठी महाविद्यालयीन तरुणांचा वापर, काॅलेज बॅगमधून 10 किलो गांजा पकडला...

 0
गांजाची तस्करी करण्यासाठी महाविद्यालयीन तरुणांचा वापर, काॅलेज बॅगमधून 10 किलो गांजा पकडला...

गांजाची तस्करी करण्यासाठी महाविलयीन तरुणांचा वापर, काॅलेज बॅगमधून 10 किलो गांजा पकडला...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - गांजाची तस्करी करण्यासाठी महाविद्यालयीन तरुणांचा वापर ड्रग्स माफिया करत असल्याचा भांडाफोड पोलिसांनी केले आहे. पुण्यात इंजिनिअरींगच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या काॅलेज बॅगमधून पोलिसांनी तपासणी केली असता दहा किलो गांजा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मुकुंदवाडी पोलिसांच्या पथकाने केलेल्या कार्यवाईत किशोर गणेश सांगळे( वय 21, राहणार देऊळगावराजा, जिल्हा बुलढाणा) या महाविद्यालयीन तरुणाला अटक केली आहे. 

घरची परिस्थिती बेताची असल्याने त्या तरुणाला बॅग पार्सल करण्यासाठी पाच हजार रुपये मिळणार होते. शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी त्याने हे पाऊल उचलले. आरोपी पुणे जिल्ह्यातील सिंहगड परिसरातील एका इंजिनिअरिंग काॅलेजमध्ये दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. काही मित्रांनी त्याला गांजा तस्करीच्या जाळ्यात ओढले. त्याला दहा किलो गांजाची बॅग केवळ इतर व्यक्तीला सुपुर्द करायची होती पोलिसांनी अचानक तपासणी केली असता बॅगेत गांजा आढळून आला यानंतर तरुणाला पोलिसांनी अटक केली. तरुणाला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांनी दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow