गावठी कट्टा बाळगणारा इसम स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात...

 0
गावठी कट्टा बाळगणारा इसम स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात...

गावठी कट्टा (पिस्टल) बाळगणारा इसम स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज)-स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे गावठी कट्टा (पिस्टल) बाळगणाऱ्या इसमाला रंगेहात पकडण्यात यश मिळवले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत आणि अमंलदार यांनी गुप्त माहिती मिळाल्यानंतर मुदेशवडगाव रोडवर पाझर तलावाच्या पुलावर पथकासह सापळा रचला. संशयित इसम मोटारसायकलवरून फिरत असल्याचे दिसून आल्यावर त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी कट्टा (पिस्टल) आणि जिवंत काडतुसे आढळून आली.

तपासात त्याचे नाव आकाश अशोक गायकवाड (वय २३ वर्षे, रा. गंगापूर, छत्रपती संभाजीनगर) असे समोर आले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक श्री. डॉ.विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत, सहायक पोलिस निरीक्षक पवन इंगळे, पोहेकाॅ वाल्मिक निकम, शिवानंद बनगे, अनिल काळे, महेश बिरुटे, चालक संजय तांदळे यांनी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow