गेल्या 12 वर्षांपासून हिंदू मुस्लिमवर राजकारण सुरू, यामुळे युवकांना रोजगार मिळाला का...? - अभिजित दिपके
Gen-G खरे अक्रामक झाले का..? काॅकरोज जनता पार्टीला प्रतिसाद मिळेल का...? राजकीय पक्षाची नोंदणी होईल का...! अशा अनेक प्रश्नांची उत्तरे दिली अभिजित दिपके यांनी...
गेल्या 12 वर्षांपासून हिंदू मुस्लिमवर राजकारणात सुरू आहे यामुळे देशातील युवकांना रोजगार मिळाला का...? दिपकेंचा सवाल...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.7(डि-24 न्यूज)- नीट परीक्षेचा पेपर लिक झाला यामुळे देशभरात खळबळ उडाली. लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय झाले. अमेरिकेत पत्रकारिता विद्येचे शिक्षण घेणारे छत्रपती संभाजीनगर येथील युवक अभिजित दिपके याने सोशलमिडीयावर काॅकरोज जनता पार्टीची संकल्पना मांडली. त्याला कोट्यवधी Gen-G यांनी प्रतिसाद देत दिपके प्रकाशझोत आले. केंद्रीय शिक्षणमंत्री यांनी नीट व सिबिएससी वर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले या प्रकरणाची जबाबदारी घेऊन आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी अभिजितने केल्याने विद्यार्थ्यांचाही प्रतिसाद मिळाला. 6 जूनला दिल्ली येथील जंतरमंतरवर दिपकेंच्या उपस्थितीत भव्य निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात मोठ्या संख्येने देशभरातील विविध राज्यांतील युवकांनी हजेरी लावली. दिपकेंनी शांतपणे हे आंदोलन करण्याचे आवाहन अगोदरच केले असल्याने आंदोलन यशस्वी झाले. परंतु सरकारने आतापर्यंत शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेतलेला नाही. दिपकेंनी सरकारला राजीनामा घेण्यासाठी सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. यानंतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काॅकरोज जनता पार्टीने दिला आहे. आंदोलनाची सांगता झाल्यानंतर अभिजित दिपके हे आपल्या घराकडे छत्रपती संभाजीनगर येथे पहाटे पोहोचले. 7 जून रोजी दुपारी चार वाजता पत्रकार परिषदेला संबोधित केले. विविध प्रश्नांची उत्तरे त्यांनी यावेळी दिली. वाचा सविस्तर बातमी.
त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे विरोधीपक्ष, आंदोलन करणारे, सरकारला प्रश्न विचारणारे पाकीस्तानी मग भारतीय फक्त भाजपाचे लोक आहेत का...? नीटचा पेपर लिक झाला अशा प्रकारे अनेक परीक्षांचे पेपर फुटत आहे मग सरकार काय करत आहे. जवाबदारी कोणाची आहे. लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. सरकारला निवडून दिले मग कोणी प्रश्न विचारायचे नाही का...? पंतप्रधानांनी शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा हे आम्ही आधीपासून म्हणत आहोत. जर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला जात नसेल तर पंतप्रधान जवाबदार आहे. जर ते रशिया व युक्रेनचे युद्ध थांबवू शकतात तर पेपर लिक थांबवू शकत नाही का...? असा सवाल अभिजितने उपस्थित केला.
पुढे सरकारविरुद्ध मुद्दे उपस्थित करणार का...? या प्रश्नावर ते म्हणाले जे जे युवकांचे मुद्दे आहेत मग ते शहरी असो किंवा ग्रामीण भागातील शेतकरी युवक किंवा कामगार युवक त्यांचे सर्व मुद्दे उपस्थित करणार आहे. राजकीय पक्षाची परिस्थिती तुम्ही बघत आहे. पक्षाच्या नोंदणीला अजून वेळ आहे. मी कालच भारतात परतलो आहे. 15 दिवसांपूर्वी हे सर्व सुरू झाले. राजकीय पक्षाची नोंदणी करणार की नाही यावर बोलणे घाईचे होईल. आम्हाला ज्यांनी समर्थन दिले ज्यांनी सदस्यपद घेतले त्यांच्याशी संवाद साधून सजेशन, आयडिया घेऊन पुढील वाटचाल करायची आहे.
सरकारने नीट काम केले तर आम्हाला बोलायची गरज भासणार नाही.
एवढे मोठे आंदोलन उभे केले तर काही दडपण आहे का...?
अभिजित म्हणाला दडपण नाही जिम्मेदारी आहे. तसेच मोठ्या लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. सोनम वांगचूंकपेक्षा मोठे कोणी असू शकते...? विश्वंभर चौधरी, अंजली दमानिया, प्रशांत भूषण, संजय हेगडे जे सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत त्यांनी देखील आम्हाला पाठिंबा दर्शवला. विरोधी पक्षांचा कुठलाही संपर्क नसल्याचे दिपकेने स्पष्ट केले.
त्यांनी पुढे सांगितले हि एक पाॅलिटीकल मुव्हमेंट आहे. या देशात प्रत्येक गोष्ट पाॅलिटीकल असते. 5 वर्षातून एकदा मत देने म्हणजे पाॅलिटीकल नसते. ज्यांना निवडून दिले त्यांना प्रश्न विचारणार की नाही...? आम्ही तेच करत आहोत त्यात गैर काय.
काॅकरोच जनता पार्टीची विचारधारा काँग्रेसशी मिळती जुळती असल्याचे काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर म्हणाले होते या प्रश्नावर उत्तर देताना दिपके म्हणाले आमचे जे इन्सपिरेशन आहे महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू, भगतसिंग हे आहेत हिच विचारधारा आमच्या पक्षाची आहे. असे त्यांनी स्पष्ट केले.
What's Your Reaction?