गोवंशाची कुर्बानी करणार नाही, शांतता कमेटीच्या बैठकीत मुस्लिम समाजाचा संकल्प...!

 0
गोवंशाची कुर्बानी करणार नाही, शांतता कमेटीच्या बैठकीत मुस्लिम समाजाचा संकल्प...!

गो वंशाची कुर्बानी करणार नाही मुस्लिम समाज, शांतता कमेटीच्या बैठकीत मुस्लिम समाजाने दिले वचन...

गोवंश कायद्याचे उल्लंघन केल्यास मकोका कायद्याअंतर्गत पोलीस कारवाई करणार... 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज) - मुस्लिम धर्मगुरु यांनी मुस्लिम समाजात गोवंश कायद्याचे काटेकोर पालन करत गो वंशाची कुर्बानी करु नये असे आवाहन मुस्लिम समाजाला केल्याने प्रतिसाद मिळाला आहे म्हणून सोमवार , 25 मे रोजी झालेल्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता कमेटीच्या बैठकीत मुस्लिम धर्मगुरु व राजकीय व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संकल्प केला की मुस्लिम समाज ज्या जनावरांवर प्रतिबंध नाही असे बोकडे, शेळी, मेंढी, म्हैस व हेल्यांची कुर्बानी करणार असल्याचे निश्चित केले आहे. गोवंश कायद्याचे काटेकोर पालन केले जाईल. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी जनजागृती केली जात आहे. गोवंशाला राष्ट्रीय पशु घोषित करावे अशी मागणीही शांतता कमेटीच्या बैठकीत करण्यात आली आहे. कुर्बानीसाठी शहरात चार ठिकाणी स्लाईडवर हाऊस निश्चित केले आहे तेथेच कुर्बानी करावी असे आवाहन करण्यात आले. ईद उल अजहा बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर तीन दिवस कुर्बानी केली जाते म्हणून विज प्रवाह सुरळीत झाला पाहिजे, स्लाईडर हाऊसची संख्या वाढवावी. पाणी मुबलक मिळाले पाहिजे, स्वच्छतेसाठी मनपाचे योग्य नियोजन असावे. घनकच-याचे व्यवस्थापन योग्य पध्दतीने झाले पाहिजे, ज्या भागात बोकड्यांची खरेदी विक्री सुरू आहे जसे चंपा चौक, कटकट गेट, रोशन गेट, शहागंज व विविध मुस्लिम बहुल भागात ट्राफीकची समस्या निर्माण होत आहे म्हणून वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस तैनात करण्याची मागणी करण्यात आली. शहरात बोकडे विक्रीसाठी गाडयांची वाहतूक सुरू आहे त्यांना त्रास व्हायला नको, ईदगाह मैदानात पिण्याचे पाणी सावलीसाठी

सोय व विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

पोलिस आयुक्त प्रविण पवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले ईद हा सण शांततेत साजरा करावा. कायदा सुव्यवस्था खराब होणार नाही यासाठी प्रयत्न करावे. कोणत्याही समाजाचे भावना दुखणार नाही असले कृत्य करु नये. गोवंश कायद्याचे पालन करावे. गोवंश वाहतूक व हत्या, खरेदी विक्री केल्यास मकोका कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल. शहरात जनावरांच्या वाहतूकीवर नजर ठेवण्यासाठी नाक्यांवर तपासणीसाठी पथके तैनात करण्यात आली आहे. ईदनिमित्त शहरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. शहराचे वातावरण खराब करण्याचा समाजकंटक प्रयत्न करत असतील तर सायबर पोलीसांची सोशलमिडीयावर नजर असणार आहे. शहरातील नागरिक सुज्ञान आहे. सर्व सण आपण शांततेत साजरे केले ईद पण शांततेत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी मार्गदर्शन करताना पुढे सांगितले शहरात नवीन उद्योग येत असल्याने भरभराटी सुरू आहे. उद्योजक गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असल्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहे. शहरात अमन शांती नेहमीप्रमाणे राहणे आवश्यक आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर, पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले, पोलिस उपायुक्त प्रशांत मोहिते, हाफीज इक्बाल अन्सारी, मौलाना डॉ.रशीद मदनी, विरोधीपक्षनेते समीर साजिद बिल्डर, एमआयएमचे गटनेते हाजी शेरखान, नगरसेवक रशीद खान मामू, डॉ.शेख मुर्तुझा, जावेद कुरेशी, नगरसेवक काकासाहेब काकडे, हाजी इसाक खान, माजी महापौर गजानन बारवाल, नगरसेवक अजहर पठाण व मुस्लिम धर्मगुरु, एमआयएमचे सर्व नगरसेवक व धार्मिक व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. सुत्रसंचलन पोलिस निरीक्षक (गुन्हे शाखा) अविनाश आघाव यांनी केले. बैठकीत मनपा, महावितरण, वक्फ बोर्डाचे अधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow