गोवंश तस्करी करणाऱ्या 11 वाहन व चालकांचे परवाने आरटिओ कडून निलंबित...!

 0
गोवंश तस्करी करणाऱ्या 11 वाहन व चालकांचे परवाने आरटिओ कडून निलंबित...!

गोवंश तस्करी करणा-या 11 वाहन व चालकांचे परवाने आर.टी.ओ. कडुन निलंबित. .....

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज) -चोरटया मार्गाने गोवंश जनावरांची अवैधरित्या कत्तल, गोमांसाची विक्री, आणि जनावरांना अत्यंत क्रुरतेने डांबुन त्यांची बेकायदेशिर वाहतूक करणा-या टोळयांविरुध्द ग्रामीण पोलीसांनी अत्यंत आक्रमक आणि कठोर पावले उचलली आहेत.  

पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांचे निर्देशानुसार जिल्हा पोलीसांनी प्रथमत: बेकायदेशिर व चोरटया मार्गाने गोवंश वाहतुक करण्या-या वाहन व चालक यांचेवर जरब बसविण्यासाठी यातील 19 वाहन व चालकांचे परवाना निलंबित करण्याचे प्रस्ताव प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठविले होते. यापैकी 05 वाहनाचा 30 दिवसांकरिता परवाना निलंबित करण्यात आला आहे. तसेच 06 चालकांचे 90 दिवसाकरिता वाहनचालविण्याचा परवाना रद्द करण्यात आला आहे. तर उर्वरित बाहेर जिल्हयातील वाहनांचे परवाने व चालकाचे लायसन्स रद्द करण्यासाठी प्रस्ताव संबधीत प्रादेशिक परिवहन कार्यालय यांना पाठविण्यात आले आहे. यानंतर सुध्दा अशा प्रकारे अनाधिकृतपणे वाहतुक करणा-या वाहन व चालकावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हाभरात गोवंश तस्करांचे विरोधात धडक मोहीम राबविल्याने गोवंश तस्कर भुमिगत झाले आहेत. 

दिनांक 16/5/26 ते 26/5/26 या 10 दिवसांच्या कालावधीत ग्रामीण पोलीसांनी संपूर्ण जिल्हयात छुप्या मार्गावर कडक नाकाबंदी, गस्त आणि सुनियोजित छापे टाकून तस्करांवर कायद्याचा प्रचंड वचक निर्माण केला आहे. यामध्ये पोलीस ठाणे, वैजापुर, गंगापुर, पैठण, कन्नड ग्रामीण, चिकलठाणा, देवगाव रं. सिल्लोड ग्रामीण, फुलंब्री, वडोद बाजार, करमाड, फर्दापुर, खुलताबाद, विरगाव, पाचोड, चिकलठाणा, शिवुर, एम.पैठण, विरगाव, या पोलीस ठाण्यांच्या विशेष पथकांनी अत्यंत धाडसी व नियोजनबध्द छापेमारी मुळे जिल्हयात मागील 10 दिवसांत 24 गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी सखोल तपास करत गुन्हयात सामील 44 आरोपी निष्पन्न करून त्यांच्यावर महाराष्ट्र प्राणी रक्षण् अधिनियम 1976 तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) व मोटर वाहन अधिनयम 1988 अन्वये सक्त कायदेशीर कारवाई केली आहे.

या मोहिमे दरम्यान ग्रामीण पोलीसांनी अत्यंत संवेदनशीलता आणि तत्परता दाखुवन कत्तलीच्या उद्देशाने तस्करांनी छुप्या ठिकाणी अत्यंत निर्दयीपणे डांबुन ठेवलेली 42 गोवंश जातीची जनावरे पोलीसांनी वेळेत धाड टाकून तस्करांच्या तावडीतून सुखरूप सोडवली. तसेच वाहनांमध्ये अत्यंत क्रुरतेने, कोंबुन विनापरवाना छुप्या मार्गाने वाहतुक करणारी 69 जनावरे जप्त करण्यात आली आहे. अशा एकुण 111 जनावरांची (किंमत 33,99,200/- रुपयांची ) सुरक्षितपणे मुक्तता केली असुन त्यांना पुढील योग्य संगोपनासाठी अधिकृत गोशाळांमध्ये जमा केले आहे. या संपुर्ण 10 दिवसांचे यशस्वी मोहिमेत ग्रामीण पोलिसांनी 44 आरोपीकडुन 24 गुन्हयात 1,945 किलो गोमांस, 111 गोवंश जातीचे जनावरे, असा एकुण 55,46,900/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  

पोलीस अधीक्षक यांनी नागरिकांना आवहन केले कि, गोवंश जनावरांची अवैध वाहतूक, कत्तल किंवा गोमांस विक्री करणा-या विरुध्द पोलिसांची कठोर व सक्त कारवाई यापुढेही सातत्याने सुरूच राहणार आहे. जिल्हयात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत कायद्या हातात घेऊ नये. अशी कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे किंवा पोलीस नियंत्रण कक्ष क्रं. 0240- 2381633 तसेच डायल 112 या क्रमांकावर माहिती द्यावी.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow