ग्रामीण पोलिसांनी पकडले 24 तासात खुनाचे आरोपि...!

ग्रामीण पोलिसांनी पकडले 24 तासात खुनाचे आरोपि...!
गाडीतील लोखंडी पाईप व गाडी चोरुन विक्री करण्याचे उद्देशाने केलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी चोवीस तासात केले जेरबंद... ग्रामीण पोलिसांची कारवाई...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज) पोलिस ठाणे चिकलठाणा हद्दीत मौजे आडगाव शिवाराजवळ सोलापूर धुळे हायवेवर एका लोखंडी पाईपने भरलेल्या गाडीमध्ये इसमाने विजय मुरलीधर राऊत, वय 52, राहणार केडगाव, ता.जिल्हा अहिल्यानगर(अहमदनगर) यांचा गाडीतील कॅबीनमधील शिटचे बाॅक्समध्ये जखमी अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. यावरून त्यांचे लहान भाऊ नामे जालिंदर मुरलीधर राऊत रा.वालवड, ता.कर्जत, जिल्हा अहिल्यानगर(अहमदनगर) यांचे फिर्यादी वरुन पोस्टे चिकलठाणा कलम 103(1) भारतीय दंड संहिता अन्वये अज्ञात इसमाविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती पुजा नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सतिश वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर मोटे, समाधान पवार, पोलिस अंमलदार लहु थोटे, श्रीमंत भालेराव, रवि लोखंडे, नरेंद्र खंदारे, विजय धुमाळ, योगेश तरमाळे, जीवन घोलप, चालक शिवाजी मगर यांनी आरोपि पकडण्यासाठी कारवाई केली आहे.
खुनातील तीन आरोपिंना बुलढाणा जिल्ह्यातील गणेश वसंत पवार, वय 34, राहणार सुलतानपूर, ता.लोणार, मुख्य आरोपी, त्याचे साथीदार गणेश गजानन कुटे, रा.सुलतानपुर, ज्ञानेश्वर गणेश घायाळ, रा.गायखेडा
, ता.लोणार यांना मेहकर परिसरातून अटक केली आहे.
विचारपूस केली असता गुन्हा केल्याची कबुली दिली असून आरोपी क्रं.1 ते 3 यांनी मयताची गाडी व गाडीतील लोखंडी पाईप असे साहित्य चोरी करून विक्री करण्यासाठी मयताच्या डोक्यात पाना मारुन खून केला व बाॅडी कॅबिन मधील शिटचे बाॅक्समध्ये लपवून ठेवली. आरोपिंनी चोरी केलेला सर्व मुद्देमाल घेण्यास ग्राहक मिळत नसल्याने व बाॅडीचा वास सुटल्याने नमूद आरोपिंनी गाडी, मुद्देमाल, मृतदेह तेथेच सोडून पळ काढला. तीनही आरोपिंना चिकलठाणा पोलिस ठाण्यात तपासकामी हजर करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.
What's Your Reaction?






