घाटी रुग्णालयाला राज्यात प्रथम क्रमांक, अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांचा सत्कार
घाटीला राज्यात प्रथम क्रमांक; डॉ. शिवाजी सुक्रे यांचा मनसेकडून सत्कार...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज)-: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व घाटी रुग्णालयाने राज्यातील 30 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या मूल्यांकनात 93.6 गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. या यशाबद्दल अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांचा मनसेकडून सत्कार करण्यात आला.
मनसेचे जिल्हा संघटक अशोक पवार पाटील (रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना) यांच्या हस्ते डॉ. सुक्रे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी शहर उपाध्यक्ष सुरेंद्र वाडेकर, विभाग अध्यक्ष मंगेश दामोदर, उपविभाग अध्यक्ष संतोष वाडेकर, उपविभाग अध्यक्ष सुनील जाधव, कचरू वीर पाटील आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?