चंद्रकांत खैरे यांचे शक्ती प्रदर्शन, पहिल्यांदाच मिरवणुकीत विविध पक्षांचे झेंडे, आदीत्य ठाकरेंचा रोड शो
 
                                भव्य मिरवणूकीने महाविकास आघाडीचे
चंद्रकांत खैरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल...
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या रोड शो चे आकर्षण...
मुस्लिम समाजातील अनेक नेते, कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले...
औरंगाबाद, दि.22 (डि-24 न्यूज)-शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत क्रांतीचौक येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीने जाऊन औरंगाबाद लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. जय भवानी-जय शिवाजी, शिवसेना जिंदाबाद, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय असो, आदित्य ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, महाविकास आघाडीचा विजय असो या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
औरंगाबाद लोकसभा निवडणूकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी क्रांतीचौक येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणूकीला सुरूवात झाली. हातात शिवसेना, कॉग्रेस, राष्ट्रवादी, रिपाइं पक्षाचे झेंडे फडकावत आणि हातात पोस्टर आणि बॅनर्स घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले होते. चाळीसगाव येथील बॅण्ड पथक, ढोल ताशांच्या गजरात जय भवानी-जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, शिवसेना जिंदाबाद, महाविकास आघाडीचा विजय असो या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. उघड्या वाहनात शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना उपनेते आमदार सचिन आहिर, आमदार उदयसिंग राजपूत हे जनतेला अभिवादन करीत होते. क्रांतीचौकातून निघालेली ही मिरवणूक सिल्लेखाना चौक, पैठणगेट, टिळकपथ मार्ग, गुलमंडी, मच्छली खडक, पानदरीबा मार्गे संस्थान गणपती जवळ विसर्जीत करण्यात आली.
गद्दार गाडणार....मशाल पेटणार
या मिरवणूकीत कार्यकर्त्यांच्या हातातील घोषवाक्य लिहिलेल्या पोस्टर्सने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. गद्दार गाडणार...मशाल पेटणार, विजय सत्त्याचा...पराभव गद्दाराचा, अब की बार...खैरे सरकार, दारू विकणारा गद्दार? की, अन्नदान करणार खुद्दार, नको खोके, नको टक्के..खैरे साहेब एकदम ओके, आमच ठरलय...आपल्या अस्तित्वासाठी, हक्काच्या एकनिष्ठ माणसासाठी, चोरांनी नेलाय धनुष्यबाण...मशाल आहे आपली शान, या घोषवाक्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या प्रसंगी माजी आमदार किशोर पाटील, भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, संजय वाघचौरे, जि. प. चे माजी अध्यक्ष रंगनाथ काळे, हरिश्चंद्र लघाने, डॉ. अण्णा शिंदे, लता पगारे, अॅड. देवयानी डोणगावकर, माजी महापौर नंदकुमार घोडेले, सुदाम सोनवणे, कला ओझा, महानगरप्रमुख राजू वैद्य, जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, सहसंपर्कप्रमुख विजयराव साळवे, लोकसभा समन्वयक प्रदीपकुमार खोपडे, राज्य संघटक चेतन कांबळे, भाकासेचे संयुक्त चिटणीस प्रभाकर मते, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, ज्ञानेश्वर डांगे, डॉ.शोएब हाश्मी, कॉग्रेसचे जेष्ठ नेते प्रकाश मुगदिया, शहराध्यक्ष शेख युसूफ, भाऊसाहेब जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पाडुरंग तांगडे, शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, इलियास किरमानी, मोतीलाल जगताप, सुभाष लोमटे, अॅड. अभय टाकसाळ, बुद्धीनाथ बराळ, रमेशभाई खंडागळे, मराठवाडा बहुजन विकास आघाडीचे रमेश गायकवाड, वैâलास गायकवाड, इब्राहिम पठाण, शेख इब्राहीम, अॅड. सय्यद अक्रम, डॉ.जफर अहेमद खान, किरण पाटील डोणगावकर, गंगापूर कारखान्याचे चेअरमन कृष्णा डोणगावकर, मोहसीन अहेमद, हामद चाऊस राष्ट्रवादीचे मोहम्मद ताहेर, अश्रफ पठाण, शिवसेना उपनेत्या, संपर्कप्रमुख ज्योती ठाकरे, संपर्क संघटक सुनीता आऊलवार, सहसंपर्क संघटक सुनीता देव, जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, राखी परदेशी, कॉग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा दीक्षा पवार, शहराध्यक्षा दिपाली मिसाळ, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा छाया जंगले, शहराध्यक्षा मेहराज पटेल, विना खरे, आपचे जिल्हाध्यक्ष सुभाष निकम, सुग्रीव मुंडे, मोहंमद बशीर, इसाक अंडेवाला, सपाचे शहराध्यक्ष फैसल खान, निसार अहमद, अॅड. जितेद्र देहाडे, प्रशांत जगताप, प्राचार्य शेख सलीम, युवासेनेचे उपसचिव ऋषिकेश खैरे, सहसचिव अॅड. धर्मराज दानवे, जिल्हा युवाधिकारी हनुमान शिंदे, मच्छिद्र देवकर, उमेश मोकासे, युवती सेनेच्या सानिका देवराज यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित
 
 
 
 
 
होते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            