चंपाचौक रस्ता शंभर फुटाचाच, रुंदीकरणासाठी नागरीकांनी सहकार्य करावे - आयुक्त जी.श्रीकांत

 0
चंपाचौक रस्ता शंभर फुटाचाच, रुंदीकरणासाठी नागरीकांनी सहकार्य करावे - आयुक्त जी.श्रीकांत

चंपाचौक रस्ता 100 फुटाचाच होणार - आयुक्त जी.श्रीकांत

आयुक्तांनी साधला नागरिकांशी संवाद धार्मिकस्थळ वाचविण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज) - चंपाचौक ते जालना रोडपर्यंतचा हा रस्ता जुन्या विकास आराखड्यानुसार 10p फुटाचाच होणार आहे रस्ता रुंदीकरणात धार्मिकस्थळ बाधित होत असेल तर रिअलाइनमेंट करून ते वाचविण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला जाईल. परंतु पर्यायच उपलब्ध नसेल तर ते काढावेच लागेल, असे मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी स्पष्ट केले. 

आज त्यांनी चंपा चौकातील चंपा मस्जिद येथे नागरिकांशी संवाद साधला. यावेळी रस्ते का रुंद हवेत, हे पटवून सांगताना, गतवर्षी रमजान महिन्यात आग लागून एकाच कुटुंबातील 7 जणांना जीव गमवावा लागल्याच्या छावणीतील घटनेचाही उल्लेख केला.

चंपाचौक ते जालना रोड रस्ता रुंदीकरणासंदर्भात मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी नागरिकांशी संवाद साधला. माजी नगरसेवकांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ते मार्किंग करताना नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत, लोकांमध्ये अनेक शंका आहेत, त्यामुळे मी आज स्वत: तुमच्याशी संवाद साधून शंका दूर करायला आलो आहे. रस्ते रुंद झालेच पाहिजे. शहराला मोठ्या रस्त्याची गरज आहे. पंचायत समिती, चंपा चौक मार्गे जालना रोड असा हा शंभर फुटाचा रस्ता होणार आहे. गरिब-श्रीमंत असा भेदभाव आम्ही करत नाही. योग्य मार्किंग करून रस्ता करण्यात येइल. सगळ्यांना विश्वासात घेवून, नोटिसा देवून हे काम करण्यात येईल. प्रशासनात कोणताच भेदभाव करत नाही. शहरातील सगळ्याच भागात रस्ते मोठे केले आहेत. आज त्या भागात फायरची गाडी, रुग्णवाहिका जावू शकते. मलिक अंबरने या शहराला वसविले, जागतिक दर्जांची पर्यटनस्थळे या शहरात आहे, शहराला ऐतिहासिक महत्व आहे. शहरात आलेल्या पर्यटक आपल्या भागात सहजरित्या मनमोकळे फिरले पाहिजे. नान खलिया व बिर्याणी खायला सहज पर्यटकांना येता आले पाहीजेत असे रस्ते हवे तर व्यवसायही वाढेल शहराची प्रगती होईल. मोठे रस्ते तुमच्यासाठीच बनवले जात आहे. 'रामा'त बिर्याणी खाऊन त्यांना त्याचे महत्व समजणार नाही, मोठे रस्ते असल्यास पर्यटनालाही चालना मिळेल., असेही आयुक्त म्हणाले.

टॅक्स भरा, गुंठेवारी करून घ्या...

बाधित मालमत्ताधारकांना टीडीआर, रोख स्वरुपात मोबदला देण्यात येईल., असे पर्यायही आयुक्तांनी लोकांसमोर ठेवला. टीडीआर धारकांची यादी महापालिकेच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात येईल. तसेच अनधिकृत बांधकामांवरील कारवाईनंतर आता नागरिक परवानगीशिवाय बांधकाम करणार नाहीत. गुंठेवारी भरुन आपली बांधकामे नियमित करुन घ्यावे तसेच थकित मालमत्ता करातही 95 टक्के सूट दिली असून, या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचेही आवाहन आयुक्तांनी केले.

बेधडक कारवाईनंतर, 'बांधकामे होत असताना, प्रशासन झोपले होते का..?,' असा प्रश्नही नागरिक उपस्थित करत आहे, असे म्हणत 'हो प्रशासन झोपले होते'., सुरुवातीला कारवाई करताना अतिउत्साहात आमच्या लोकांकडून चुका झाल्या, अशी कबुलीच यावेळी आयुक्तांनी दिली. अतिक्रमण कार्यवाई करताना काही चुका झाले. झालेल्या चुका सुधारायच्याच नाही का, काम करणाऱ्यांकडूनच चुका होतात, त्यात आम्ही सुधारणा केल्या आहेत. या अनधिकृत बांधकामांना तुम्ही (लोकप्रतिनिधी) व आम्ही (प्रशासन) जबाबदार आहोत., असेही ते म्हणाले. ज्यांच्याकडे मालमत्तेचे कागदपत्रे नाही त्यांचे पुनर्वसन केले जाईल. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत त्यांना घर दिले जाईल असा शब्द आयुक्तांनी दिला. 

यावेळी चंपा मस्जिद कमेटीचे अध्यक्ष आसिफ कुरेशी यांनी मागणी केली रस्ता रुंदीकरणाला आमचा विरोध नाही. हि तीनशे वर्ष जुनी पुरातन मस्जिद आहे. सर्वोच्च न्यायालयाचा पुरातन मस्जिद साठी निर्णय आमच्याकडे आहे. आयुक्तांनी शब्द दिला धार्मिक स्थळ वाचवण्याचा प्रयत्न करणार आहे. कमिटी सोबत ते स्वतंत्र बैठक घेवून पुढील निर्णय घेणार असल्याने आम्ही समाधानी आहोत. 

येथील व्यवसायिकांनी मागणी केली 33 मालमत्ता बाधित होणार आहे. रस्ता रुंदीकरणासाठी आमचे व्यवसाय आठ दिवसांपासून बंद आहेत. मनपाने लवकर मार्कींग करुन घेतली तर बरे होईल. आमच्या जागेवर दूकान बांधून व्यवसाय पुन्हा सुरु करता येईल अशी मागणी त्यांनी केली आहे.

या बैठकीत मस्जिद कमेटीचे अध्यक्ष आसिफ कुरेशी, माजी नगरसेवक सलिम पटेल, कलिम कुरेशी, फेरोज खान, आरेफ हुसेनी, जफर बिल्डर, ओसामा अब्दुल कदीर व बाधितांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow