वक्फ संशोधन कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलनात रिक्षा संघटना सहभागी होणार

वक्फ संशोधन कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलनात रिक्षा संघटना सहभागी होणार
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद),दि.15(डि-24 न्यूज) सध्या देशभरात मुस्लिम समाजाच्या वतीने केंद्र सरकारने मंजूर केलेल्या वक्फ संशोधन कायद्याच्या विरोधात विविध संघटना आंदोलन करत आहे. आता या आंदोलनात शहरातील विविध रिक्षा युनियन सहभागी होणार आहेत. यासाठी सर्व संघटनांची बैठक आज दुपारी सुभेदारी विश्रामगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. रिक्षाचालक मालक महासंघाचे अध्यक्ष निसार अहमद खान, न्यू जनता ऑटो युनियनचे अध्यक्ष अब्दुल रशीद खान उर्फ अज्जू भाई यांच्या नेतृत्वाखाली बैठक संपन्न झाली. ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड व विविध मुस्लिम सामाजिक संघटनांच्या वतीने जे आंदोलन हा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी केले जात आहे त्या आंदोलनात काळी फित बांधून सहभागी होणार आहे असा निर्णय घेण्यात आला.
यावेळी काँग्रेस रिक्षा युनियनचे मोहम्मद बशीर, महाराष्ट्र नवनिर्माण रिक्षा युनियनचे जाकेर पठाण, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे सलिम खामगावकर, परिवर्तन ऑटो युनियनचे शेख लतिफ, वस्ताद दल रिक्षाचालक युनियनचे इम्रान पटेल, रिक्षाचालक महासंघाचे शकील पटेल, भिमशक्ती रिक्षाचालक युनियनचे गजानन वानखेडे , कॅ.शेख सरवर आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?






