सोलापूरकरांनी केले काळी फित बांधून आंदोलन...!

 0
सोलापूरकरांनी केले काळी फित बांधून आंदोलन...!

सोलापूरकरांनी केले काळी फित बांधून आंदोलन...!

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.15(डि-24 न्यूज) सोलापूर येथील काली मस्जिद प्रकरणात तेथील नागरिकांनी अखिल भारतीय जनजागृती संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या कार्यालयासमोर तोंडाला काळी फित बांधून निषेध आंदोलन केले.

आंदोलकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे वक्फ मंडळ कार्यालयात दलाल माफियांना बंदी घालण्यात यावी. काळी मस्जिद ट्रस्टच्या बेकायदेशीर देखरेख मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्यात यावे. हजर मुतवल्ली यांना बेपत्ता दाखवणा-या व गैरहजर सभासदांची बोगस सही करणा-या ट्रस्टी विरुद्ध गुन्हा दाखल करावे. निवेदनावर इब्राहिम जमादार, राजु हुंडेकरी, असलम सय्यद, निसार जहागिरदार यांची सही आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow