चिकलठाण्यात युवकाची आत्महत्या, शव घेण्यास नकार, केले रस्ता रोको आंदोलन...

 0
चिकलठाण्यात युवकाची आत्महत्या, शव घेण्यास नकार, केले रस्ता रोको आंदोलन...

चिकलठाण्यात युवकाची आत्महत्या, शव घेण्यास नकार, केले रास्ता रोको आंदोलन...

चिकलठाण्यात शांतता, अफवांवर विश्वास ठेवू नका पोलिसांचे आवाहन...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज) - चिकलठाण्यात 30 वर्षाच्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने दिवसभर मिनी घाटीत गोंधळ उडाला. येथे शेकडोंचा जमाव जमला होता. राजेश्वर साईनाथ नवपुते, वय 30, राहणार चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर असे युवकाचे नाव आहे. शहरात काही महीन्यापूर्वी अतिक्रमण हटावो मोहीम मनपा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात आली. या कार्यवाईत नवपुते या युवकाची तीन मजली इमारत जाणार होती. मनपाने 15 ऑगस्ट पर्यंत स्वतः हुन अतिक्रमण काढण्याचे आवाहन केले होते म्हणून मोबदला न घेता अतिक्रमण हटवून घेतले. कुटुंब उघड्यावर आले होते. घर भाड्याने मिळाले नसल्याने नातेवाईकांच्या शेतात हे कुटुंब दयनीय अवस्थेत राहत होते. मोबदल्याचे आश्वासन मिळत होते पण मोबदला काही मिळाला नाही. युवकाला मुलगा होता परंतु कुटुंबाला गोठ्याच्या घरात आणायचे का तेव्हापासून तो नैराश्यात गेला होता. 

आर्थिक मोबदला सुध्दा मिळाला नव्हता. तेव्हापासून तो नैराश्यात होता. यामुळे त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. असा आरोप नातेवाईकांनी केला. मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी मिनी घाटीत यावे व चर्चा करुन आश्वासन द्यावे त्यानंतरच शव ताब्यात घेवून अंतिम संस्कार करण्याचा पवित्रा घेत जालना रोडवर उशिरा रात्रीपर्यंत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे काही तास वाहतूक ठप्प झाली होती. पोलिस अधिकारी यांनी मध्यस्थी करत ठोस आश्वासन दिले त्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

चिकलठाण्यात शांतता, अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलिसांचे आवाहन...

रस्ता रुंदीकरणात आपले घर जाणार असल्याच्या भीतीने तरुणाने आत्महत्या केल्याची घटना चिकलठाण्यात घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. राजेश्वर साईनाथ नवपुते यांच्या निधनामुळे मिनी घाटीत गर्दी जमली होती. मृतक राजेश्वरला चार महीन्याचे बाळ आहे. आपले घर जाणार आता सर्व संपले असे तो सतत बोलत होता. त्याची भीती संपवण्याचा प्रयत्न कुटुंबाने व मित्रांनी केला तरीही प्रयत्न निष्फळ ठरले. शेती विकून तीन मजले घर बांधले पण घर रस्ता रुंदीकरणात आईल. म्हणून घराचे सामान तीन चार ठिकाणी हलवले होते. अशी माहिती त्यांच्या भावाने दिली. तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने गावकरी अक्रामक झाले चक्क शव जालना रोडवर आणून रस्ता रोको आंदोलन उशिरा रात्रीपर्यंत सुरू होता. पोलिसांनी मध्यस्थी केली मनपाकडून ठोस आश्वासन दिले जाईल त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. चिकलठाणा परिसरात शांतता आहे अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow