जटवाडा रोडवर पाणीबाणी सुरू, खाजगी टँकर लाॅबीची मनमानी, कोठे आहे मनपाचा टँकर...!

 0
जटवाडा रोडवर पाणीबाणी सुरू, खाजगी टँकर लाॅबीची मनमानी, कोठे आहे मनपाचा टँकर...!

जटवाडा रोडवर पाणीबाणी, टँकर लाॅबीची मनमानी, कोठे आहे मनपाचा टँकर...! खाजगी टँकर चालकांवर कोणाचे नियंत्रण...?

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.29(डि-24 न्यूज) - प्रभाग क्रमांक 1, चेतना नगर, सईदा काॅलनी, हुनाजी नगर, केजीएन पार्क, सुमैरा गार्डन, फिल्टर परिसर, बशिर नगर, अंबर हिल, राज नगर, न्यू आलमगिर काॅलनी, जटवाडा रोड येथील परिसरात बोरींगचे पाणी आटल्याने पाणीबाणी सुरू झाली आहे. हर्सुल तलाव पायथ्याशी असताना जारच्या पाण्याने तहान भागवावी लागत आहे. वापराच्या पाण्यासाठी येथील रहीवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेचे पाणी सुरु झाले नसल्याने तहान भागवण्यासाठी येथील नागरिकांना वनवन भटकावे लागत आहे. डिझेलची टंचाई असल्याने खाजगी टँकरचालकांचा भाव वाढले आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर व शुक्रवारी आंघोळीसाठी पाणी नसल्याने नागरिकांना टँकरच्या प्रतिक्षेत आठी रात्र जागून काढली. अनेकदा टँकरचालकाला फोन केले तर दहा ते बारा तासानंतर वापराचे पाणी मिळत असल्याची परिस्थिती आहे. महापालिकेच्या वतीने सईदा काॅलनी व आजूबाजूच्या परिसरात चार टँकर सुरू असल्याचा दावा केला जात आहे मग हे पाणी कुठे मुरत आहे हंडाभर पाणी आम्हाला मिळत नाही पाण्यासाठी भटकंती सुरू आहे म्हणून नगरसेवकांवर येथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. खाजगी टँकर लाॅबी एक ड्रम पाणी 100 रुपयांत व दोन हजार लिटर पाणी चारशे रुपयांपर्यंत मनमानी दराने विक्री करत असल्याची माहिती येथील रहीवाशांनी दिली. मनपा प्रशासनाने येथे पावसाळा सुरू होईपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करावा अशी मागणी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow