जनावरांचे कत्तलखाने बंद करण्यासाठी काढला शांतता मोर्चा...

 0
जनावरांचे कत्तलखाने बंद करण्यासाठी काढला शांतता मोर्चा...

जनावरांचे कत्तलखाने बंद करण्यासाठी काढला शांतता मोर्चा...

गंगापूर तालूक्यात मस्जिदच्या जागेवर बसवला पुतळा, पुतळा हटवण्याची मागणी...

छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज) जनावरांचे कत्तलखाने सरकारने बंद केले तर होणारे वादविवाद थांबतील व वातावरण खराब होणार नाही हि मागणी व विविध मागणीसाठी शहरात शांतता मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर काढण्यात आला.

शेख खुर्रम अब्दुल रशिद खान यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्तांना विविध मागणीचे निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगाणा व विवध राज्यात मोठमोठ्या कत्तलखान्यात जनावरांची कत्तल केली जाते ते मोठमोठे कत्तलखाने बंद करावे. महाराष्ट्र व इतर राज्यात अल्पसंख्यांक मुस्लिम समाजातील लोकांना रस्त्यावर गाडी अडवून गोमांस असल्याच्या संशयावरुन हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते बेदम मारहाण करण्याच्या घटना वाढत आहे यामुळे देशातील कायदा व सुव्यवस्था खराब होण्याची शक्यता असते. गोवंश कत्तली वर बंदी आहे इतर जनावरांचे मांसही पकडले जात असल्याची घटना होत आहे. गोवंश पोलिसांनी जप्त केले तीच जनावरे गोशाळेतून बाजारात परत विक्रीसाठी आणल्याचे गुन्हे सुध्दा दाखल झाले आहे. असले प्रकार सरकारने रोखावे. गोशाळेत योग्य प्रकारे जनावरांचे पालनपोशन करावे यासाठी आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत परंतु संशयावरुन निष्पाप लोकांना मारहाण करण्याचा अधिकार त्या कार्यकर्त्यांना कोणी दिला असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

गंगापुर तालूक्यात मस्जिदच्या जागेवर बसवला पुतळा...

वक्फ संस्था मस्जिद मौजे काटे पिंपळगाव तालूका गंगापूर ही वक्फ संस्था महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ औरंगाबाद येथे नोंदणी झालेली आहे. याचा नोंदणी क्रं.MSBW/ABD/489/2013 आहे. हि अति जुनी मस्जिद व त्याची जागा आहे. दिनांक 11/5/2025 रोजी मौजे काटे पिंपळगावातील काही समाजकंटकांनी रात्रीच्या वेळेस विना परवानगी अचानक मस्जिदच्या जागेवर पुतळा बसवल्याने समाजात नाराजी पसरली आहे. जिल्हा वक्फ अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधिक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, तहसिलदार, गट विकास अधिकारी, उपविभागीय अधिकारी, पोलिस निरीक्षक, शिल्लेगाव, गंगापूर यांच्याकडे लेखी तक्रार दिलेली आहे तरीही अनाधिकृत पुतळा मस्जिदच्या जागेवरुन हटवण्याची कार्यवाही करण्यात आली नसल्याने आज विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी शेख मोहंमद खुर्रम अब्दुल रशीद, अशरफ पठाण, शेख रशीद व गांवकरी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow