जायकवाडी जलाशयातून गोदापात्रात आजपासून पाणी सोडणार, नागरीकांनी सतर्क राहावे...

जायकवाडी जलाशयातून गोदापात्रात पाणी सोडणार..नागरीकांनी सतर्क राहावे
पैठण, दि.14
जायकवाडी धरण प्रकल्प, (नाथसागर) जलाशय पैठणच्या मुख्य सांडव्याच्या द्वार क्र. 18 व 19 मधून आज दि. 14/05/2025 रोजी सायंकाळी ठीक 8 वा. चनकवाडी, आपेगांव, व हिरडपुरी बंधारा करिता गोदावरी नदीपात्रात 100 क्यूसेक विसर्ग सुरु करण्यात येत आहे. उद्या सकाळी टप्प्या टप्प्याने विसर्गात वाढ करण्यात येईल.
तरी गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी आपापल्या आवजारे, यंत्र, मोटार पंप ई. साधन-सामुग्री व पशुधन आणि लहान बालके यांची काळजी घ्यावी.
अशी माहिती धरण नियंत्रण कक्ष, जायकवाडी धरण, नाथसागर (जलाशय) पैठण यांनी दिली आहे.
What's Your Reaction?






