जायन्टस ग्रुप ऑफ पायोनियर तर्फे जायन्टस सर्विस वीक मनपा विद्यालयात उत्साहात संपन्न...

जायन्ट्स ग्रुप ऑफ़ पायोनियर तर्फे जायन्ट्स सर्विस वीक मनपा विद्यालयात उत्साहात संपन्न...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज)- जायन्ट्स ग्रुप पायोनियर व महानगरपालिका शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 17 ते 23 सप्टेंबर जायंट्स सर्विस वीकचे नियोजन करण्यात आले होते.
यामध्ये विद्यार्थ्यांसाठी क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. याचे उद्घाटन व सर्विस वीकचे उद्घाटन मनपा उपायुक्त अंकुश पांढरे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले. याप्रसंगी ग्रुपचे अध्यक्ष शितल अग्रवाल, सचिव आरती सोनी, खजिनदार सरिता मालानी, प्रकल्प अधिकारी अमित मालानी व अमित सोनी, मुख्याध्यापक संजीव सोनार व शशिकांत उबाळे उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या सर्व माध्यमिक विद्यालयांमध्ये विद्यार्थिनींसाठी 18 हजार सॅनिटरी नॅपकिनचे वितरण करण्यात आले.
मनपाच्या शिक्षकांची आरोग्य तपासणी सी एस एम एस एस या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरांनी मनपा प्रियदर्शनी विद्यालयात येऊन दोन दिवसात मनपाच्या 350 शिक्षकांची आरोग्य तपासणी नि:शुल्क केली.
याप्रसंगी मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेच्या, महाविद्यालयाच्या संचालिका श्रीमती स्नेहल मुळे महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशन तर्फे – सौ. सुर्यमाला मालानी, श्री. विनोद शेवटकर व डॉ. गुरुदत्त राजपूत. हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
या शिबिरामध्ये शिक्षकांचे रक्ताच्या तपासणी, इसीजी, स्त्रीरोग तज्ञांकडून महिलांची तपासणी डोळ्याची व जनरल तपासणी नि:शुल्क करण्यात आली.
मनपाच्या सर्व माध्यमिक विद्यालयांमध्ये मुलींसाठी स्मार्ट गर्ल या विषयावर रत्नाकर महाजन यांनी मार्गदर्शन केले. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पैसा व पैशाची बचत कशी करावी या विषयावर अभय शहा व स्वस्तिक मणियार यांनी मार्गदर्शन केले.
मनपा प्राथमिक विद्यालय गारखेडा येथे 17 सप्टेंबर रोजी अध्यक्ष शितल अग्रवाल यांनी ध्वजवंदन केले. तसेच विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर प्यूरिफायर जायन्ट्स पायोनियर ग्रुपच्या वतीने बसवून देण्यात आले.
आधार वृद्धाश्रमात वयस्कर लोकांसाठी डायपरचे वितरण करण्यात आले तसेच एक दिवसाचे जेवण ग्रुपच्या वतीने देण्यात आले.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात तीनशे झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
या प्रकल्पासाठी साकला लँडस्केपिंग यांनी सहकार्य केले.
ज्ञानेश विद्या मंदिर येथे विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर लॅब साठी स्टूलचे वितरण करण्यात आले.
गेवराई येथील बालग्राम अनाथालयाच्या विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. या सप्ताहासाठी मनपा प्रियदर्शिनीचे मुख्याध्यापक संजीव सोनार व गारखेडा शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत उबाळे यांनी परिश्रम घेतले
24 सप्टेंबर रोजी या उत्सवाचा समारोप समारंभ पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मनपा उपायुक्त अंकुश पांढरे उपस्थित होते.
जायंट्स सप्ताह उत्सवाची संपूर्ण कल्पना व अंमलबजावणी ही अमित व सरिता मालानी यांनी केली. या कार्यक्रमाच्या यशासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले. या आठवड्याचे प्रकल्प अध्यक्ष म्हणून अमित व आरती सोनी यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
या उत्सवात सक्रिय सहभाग घेऊन कार्यक्रम अविस्मरणीय करण्यात जायन्ट्स पायोनियर ग्रुप अध्यक्ष – शीतल अग्रवाल सदस्य विनोद अग्रवाल ,अभय व वर्षा शाह, स्वस्तिक व पूजा मनियार, अशिमा जायसवाल, निकिता अग्रवाल, सागर व रुपाली सकला, आशिष व गौरी झावर, श्वेता सोमानी, भारत व मेघा पाटणी, हरीश व पूनम अग्रवाल, अजय व अनीता अग्रवाल, पंकज व स्वप्ना वळसेकर, रितेश अग्रवाल, मुकुल व सुहानी गोयल, शीतल पांडे व रुचिका जायसवाल , अंकिता टीबडेवाल, शैली अग्रवाल , रोशनी टीबडेवाल यांनी परिश्रम घेतले.
What's Your Reaction?






