जालिंदर शेंडगे व 40 ते 50 कार्यकर्त्यांविरुध्द पोलिस ठाण्यात इम्तियाज जलील यांची तक्रार
जालिंदर शेंडगे व 40 ते 50 कार्यकर्त्यांविरुध्द पोलिस ठाण्यात इम्तियाज जलील यांची तक्रार
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज) 20 नोव्हेंबर मतदानाच्या दिवशी बोगस मतदान, कार्यकर्त्यांवर हल्ला, धुडघुस घालणे, धार्मिक घोषणाबाजी व गोंधळ घालणारे भारतीय जनता पार्टीचे नेता जालिंदर शेंडगे व इतर 40 ते 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करावे अशी लेखी तक्रार एमआयएमचे औरंगाबाद पूर्वचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांना दिली आहे.
तक्रारीत म्हटले आहे मतदान सुरू असताना उमेदवार म्हणून आपल्या मतदान केंद्रावर विविध ठिकाणी पाहणीसाठी फिरत असताना संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास मला समजले की पंडित नेहरू काॅलेज येथील सेक्टर 3 येथील मतदान केंद्रावर भारतीय जनता पार्टीचे नेता जालिंदर शेंडगे व त्यांच्या सोबत इतर कार्यकर्ते सदरील केंद्रावर जमा होऊन त्यांनी अनेक बोगस कार्ड मतदार असून ते बोगस मतदान करत आहे. म्हणून मी ताबडतोब सदरील मतदान केंद्रावर पोहचलो. तेथे गेल्यावर मला आमच्या पोलिंग एजंटने दाखवले की तेथे उपस्थित एक महीला बोगस मतदान करण्यासाठी आलेली आहे. आमचे बोलणे ऐकून ती महीला केंद्राच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती. म्हणून मी तेथे उपस्थित असलेली पोलिस कर्मचारी यांना त्या महीलेला अडवून पकडण्यास सांगितले असता दूर्देवाने तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी तीला न पकडता पळून जाण्यास मदत केली. म्हणून मी केंद्राच्या बाहेर आलो असता तेथे उपस्थित भारतीय जनता पार्टीचे नेता जालिंदर शेंडगे व इतर अनेक कार्यकर्ते बुथ केंद्राच्या दारावर मला अडवून त्यांनी व त्यांच्यासोबत असलेल्या सर्वांनी शिविगाळ करण्यास सुरुवात केली व सर्वांनी धार्मिक घोषणाबाजी केली. सर्व कार्यकर्त्यांनी आमच्या अंगावर येऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला व गैरकायदेशीर मंडळींना जमवून केंद्रावर दहशतीचे वातावरण निर्माण केले व सर्व ही आम्ही त्यांना बोगस मतदान करु दिले नाही व त्यांच्यासोबत असलेल्या बोगस मतदाराला मतदान करण्यापासून रोखल्याने त्यांनी रागात येऊन केलेले गैर कायदेशीर कृत्य केले. म्हणून माझी भारतीय जनता पार्टीचे नेता जालिंदर शेंडगे व इतर 30 ते 40 अनोळखी कार्यकर्त्यांवर सुमारे 50 बोगस मतदान करण्यासाठी आलेल्या लोकांवर गुन्हा दाखल करुन कडक कायदेशीर कारवाई करावी हि नम्र विनंती. विशेष म्हणजे जालिंदर शेंडगे व त्यांच्यासोबत असलेल्या अनोळखी कार्यकर्ते यांचे सबब बुथच्या मतदान यादीत नाव नव्हते किंवा ते उमेदवार अथवा उमेदवार प्रतिनिधी नाही आणि पोलिंग एजंट सुध्दा नव्हते तरी सुद्धा त्यांनी गैरकायदेशिररित्या बुथ ताब्यात घेतले होते असे इम्तियाज जलील यांनी तक्रारीत म्हटले आहे.
What's Your Reaction?