जाळपोळीच्या घटनेनंतर बीड जिल्ह्यात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू
बीड जिल्ह्यात संचारबंदी, जाळपोळीच्या घटनेनंतर जिल्हाधिकारी यांचा निर्णय
48 तासांसाठी इंटरनेट सेवा बंद...
बीड,दि.30(डि-24 न्यूज) आज सकाळपासून बीडमध्ये जमावाच्या वतीने जाळपोळ करण्यात आली. आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने जिल्ह्यात जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी आज मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आली असल्याचे आदेश काढले.
आंदोलनाने उग्र रूप धारण केले आहे. जिल्ह्यात परिवहन महामंडळ व इतर शासकीय अधिकारी यांच्या वाहनास आग लावल्याचे प्रकार घडले. आज आंदोलकांनी विविध शासकीय कार्यालयावर मोर्चे काढून कार्यालय बंद केली. काही ठिकाणी कार्यालयाला आग लावणे व दगडफेक करणे असे प्रकार घडले. यामुळे शासकीय व खाजगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्याअर्थी बीड जिल्ह्यात चालू असलेल्या आंदोलनामुळे सार्वजनिक व खाजगी मालमत्तेस मोठ्या प्रमाणात हानी पोहचते आहे. यामुळे संचारबंदीचे आदेश लागू करण्याचा निर्णय मी घेतला आहे. आपल्या अधिकाराचा वापर करुन फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(2) अन्वये एकतर्फी बीड जिल्हा मुख्यालय व सर्व तालूका मुख्यालयापासून पाच किलोमीटर हद्दीपर्यंत तसेच सर्व राष्ट्रीय महामार्गावर पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू करत असल्याचे पत्रात म्हटले आहे.
बीड जिल्ह्यात काय घडले आज सकाळपासून...
बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर जमावाने दगडफेक करत जाळपोळ केली. या घटनेत जवळपास सहा ते सात वाहने जळून खाक झाली. गेली अनेक वर्षांपासून राज्यकर्ते व लोकप्रतिनिधी यांच्यावर मराठा समाजाला टिकणारे आरक्षणाबाबत उदासीन दिसत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
हजारो गावांमध्ये पुढा-यांना प्रवेशबंदी घातली असताना जमाव सोळंके यांच्या घरावर चालून गेला.
बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घराची जाळपोळ करण्यात आली या घटनेत आगीचे लोळ दूरपर्यंत पसरत असल्याने खळबळ उडाली. घरात उभी असलेल्या अनेक चारचाकी गाड्या व मोटारसायकल जळून खाक झाली. याव्यतिरिक्त नगर परिषद इमारत, सनराईज होटेल, राष्ट्रवादी भवनला आग लावल्याची घटना घडली. या घटना होत असल्याचे कळताच बाजारपेठ बंद करण्यात आले. रस्त्यावर टायर जाळून आंदोलक अक्रामक झाले होते. मराठवाड्यात या आंदोलनामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. एसटी बससेवा अनेक आगारात बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. 49 आगारामधून 30 आगाराची बससेवा ठप्प झाली आहे दररोज लाखो रुपयांचे एसटी महामंडळाचे नुकसान होत आहे. खाजगी वाहने मनमानी भाडे वसूल करत आहे तर काही प्रवासी विविध शहरांत अडकले आहेत.
What's Your Reaction?