जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपा अक्रामक, केले निषेध आंदोलन
जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपा अक्रामक, केले निषेध आंदोलन
औरंगाबाद, दि.4(डि-24 न्यूज) प्रभु श्रीराम यांच्या बाबत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कथित वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे देशभरात भाजपा अक्रामक झाली आहे. कार्यकर्ते रस्त्यावर उतरून निषेध करत आहे. भाजपाचे आमदार राम कदम यांनी पोलिसांकडे तक्रार देणार असल्याचे म्हटले आहे. उस्मानपुरा येथील भाजपा कार्यालयासमोर शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले. जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करत हि राष्ट्रवादी शरद पवार गटाची भुमिका आहे का असा प्रश्न उपस्थित करत बोराळकर यांनी सांगितले नेहमी आव्हाड बेताल वक्तव्य करतात. हिंदू देवी देवतांबद्दल असले वक्तव्य खपवून घेणार नाही त्यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत असा प्रश्न शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी विचारला व कार्यवाहीची मागणी केली.
जितेंद्र आव्हाड यांचे छायाचित्र असलेल्या पोस्टरवर काळे फासत महीला कार्यकर्त्यांनी चपला मारले. कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या विरोधात घोषणाबाजी केली. शिर्डी येथे सुरू असलेल्या कार्यकर्ता शिबिरात आव्हाडांनी हे कथित वक्तव्य केले आहे यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
याप्रसंगी डॉ. उज्वला दहिफळे, अनिल मकरीये, हर्षवर्धन कराड, अमृता पालोदकर, मनिषा मुंडे, शालिनी बुंदे, जालिंदर शेंडगे, संजय जोरले, राजेश मेहता, मनिष पिंपरीये, लक्ष्मण औटे, कुचरु घोडके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?