जिल्हाधिकारी दिलिप स्वामी यांनी लेट लतीफांची घेतली क्लास....

 0
जिल्हाधिकारी दिलिप स्वामी यांनी लेट लतीफांची घेतली क्लास....

जिल्हाधिकारी दिलिप स्वामी यांनी लेट लतीफांची घेतली क्लास....पगार कपात होणार...

छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज) जिल्ह्यातून शेतकरी व सामान्य नागरीक आपल्या महत्वाच्या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येतात. त्यांना कार्यालयीन वेळेवर अधिकारी व कर्मचारी भेटले नाही तर रिकाम्या हाताने परतावे लागते.

आज सकाळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सकाळी दहा वाजता मुख्य प्रवेशद्वारावर बसून लेट लतिफांची क्लास घेतल्याने कार्यालयात उशिरा येणा-या अधिकारी व कर्मचा-यांचे धाबे दणाणले. अधिकारी व कर्मचारी वेळेवर कार्यालयात येत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाले होते. आज सकाळी तब्बल 80 टक्के कर्मचारी सकाळी दहा वाजता कार्यालयात आढळून आले नाहीत. जिल्हाधिका-यांनी अहवाल तयार केला असून कर्मचा-यांवर कार्यवाही करण्याचा इशारा दिला आहे. लेटलतीफांची आता पगार कपात होणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow