जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला निवडणूक पूर्वतयारीचा आढावा
 
                                जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला निवडणूक पुर्वतयारीचा आढावा
औरंगाबाद, दि.27(डि-24 न्यूज):- लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व नोडल अधिकाऱ्यांकडून निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेतला. त्या त्या विषयाच्या अनुषंगाने आज जिल्हा नियोजन सभागृहात हा आढावा घेण्यात आला.
महावितरणचे सह व्यवस्थापक राहुल गुप्ता, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, अपर आयुक्त रणजीत पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर सर्व नोडल अधिकारी आदी उपस्थित होते.
बैठकीत नोडल अधिकाऱ्यांच्या सोबविलेल्या जबाबदाऱ्यानुसार कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यात आचारसंहिता, मतदान कर्मचारी व्यवस्थापन, अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण, निवडणूक साहित्य मागणी- वितरण, वाहतुक व्यवस्था, संगणक कक्ष, कम्युनिकेशन प्लॅन, स्वीप, कायदा व सुव्यवस्था, मतदान यंत्र, खर्च निरीक्षण, मतपत्रिका, डमी , टपाली मतपत्रिका, मिडिया, संपर्क कक्ष, मतदार यादी कक्ष, मतदार मदत व तक्रार निवारण कक्ष, निवडणूक निरीक्षक, मतदारांना मतदान केंद्रावर द्यावयाच्या सुविधा (शहरी व ग्रामिण) मतमोजणी, वेबकास्टिंग इ. विविध विषयांनुसार आढावा घेण्यात आला.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            