जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानासमोर शेतकऱ्यांनी केले अर्धनग्न आंदोलन...!
जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानासमोर शेतकऱ्यांनी केले अर्धनग्न आंदोलन...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज) - स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांनी अक्रामक होत जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानासमोर दिपावलीच्या दिवशी अर्धनग्न आंदोलन करत सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केला. दिवाळीपूर्वी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचे सरकारने आश्वासन दिले होते. मदत शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या दारात चटणी भाकर खाऊन निषेध केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला. काही काळ झटापट झाली. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यापैकी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. सरकारने पॅकेजची घोषणा केली परंतु शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळाली नसल्याने स्वाभीमानी शेतकरी संघटना अक्रामक झाली.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष कृष्णा साबळे यांनी सांगितले सरकारने आश्वासन दिले होते परंतु शेतकऱ्यांना प्रत्यक्षात काहीच मिळाले नाही. आज दिवाळी आहे तरीही शेतकऱ्यांच्या घरात अंधार आहे. जनावरांना चारा नाही शासन केवळ घोषणा करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी जिल्हाध्यक्ष कृष्णा साबळे, ज्ञानेश्वर मुळे, प्रकाश बोरसे, दिनकर पवार, राजु बोंगाने, शिवाजी धरफळे, पुरण सनान्से, गणपत खरे, यादवराव कांबळे पदाधिकारी व कार्यकर्ते अर्धनग्न आंदोलन सहभागी झाले.
What's Your Reaction?