जिल्हा रुग्णालयात सर्जनची आवश्यकता, इच्छुक तज्ञ डॉक्टरांना अर्ज करण्याचे आवाहन

 0
जिल्हा रुग्णालयात सर्जनची आवश्यकता, इच्छुक तज्ञ डॉक्टरांना अर्ज करण्याचे आवाहन

जिल्हा रुग्णालयात सर्जनची आवश्यकता; इच्छुक तज्ज्ञ डॉक्टरांना अर्ज करण्याचे आवाहन...

छत्रपती संभाजीनगर (डि-24 न्यूज), दि.30 (डि-24 न्यूज) – राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथे व्हिटीओरेटिनल (Vitreo-Retinal) सर्जनची आवश्यकता आहे. यासाठी पात्र व इच्छुक नेत्रतज्ज्ञ डॉक्टरांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक अर्हता MS/DNB (Ophthalmology) असणे आवश्यक असून, संबंधित डॉक्टरांना व्हिटीओरेटिनल शस्त्रक्रिया करण्याचे कौशल्य व क्षमता असणे अनिवार्य आहे. निवड झालेल्या तज्ज्ञ डॉक्टरांसोबत सामंजस्य करार (MOU) करण्यात येणार आहे. प्रत्येक शस्त्रक्रियेसाठी संबंधित डॉक्टरांना प्रति रुग्ण 10 हजार रुपये मानधन अदा करण्यात येईल.

इच्छुक व पात्र व्हिटीओरेटिनल सर्जन यांनी आपली शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रे, मागील तीन वर्षांचा अनुभव प्रमाणपत्र तसेच 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरसह आवश्यक कागदपत्रे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथे दि. 6 नोव्हेंबर 2026 पर्यंत सादर करावीत.

तरी पात्र व इच्छुक तज्ज्ञ डॉक्टरांनी विहित मुदतीत अर्ज व आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow