जीन्सी पोलिसांनी पकडला नायलॉन मांजा, एक आरोपी अटक
 
                                जीन्सी पोलिसांनी पकडला नायलॉन मांजा, एक आरोपी अटक
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज) जीन्सी पोलिसांनी विक्रीसाठी बंदी असलेल्या नायलॉन मांजा पकडून एका आरोपिला अटक करुन 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
भवानीनगर, गल्ली नंबर 7 येथे लवकेश संतोष भगत, वय 20, राहणार जुना मोंढा, गवळीपूरा याने त्याच्या राहत्या घरी अवैधरित्या बंदी असलेल्या मांजा विक्री करत साठवून ठेवल्याची माहिती मिळाली होती. जीन्सी पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून शिताफीने छापा मारला असता Mono या कंपनीचे एकूण 42 वेगवेगळ्या रंगांचे नायलॉन मांजाचे प्लास्टिकचे गट्ट असा एकूण 21 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. सदरचा मुद्देमाल जप्त करुन आरोपिवीरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास सपोनि गौतम वावळे करत आहे. शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे पतंग उडवताना नायलॉन मांजाचा वापर करु नये अथवा खरेदी विक्री करु नये. नायलॉन मांजाबाबत काही माहिती असल्यास जीन्सी पोलिसांना कळवावे असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी केले आहे. सदरील कार्यवाही पोलिस उपनिरीक्षक गणेश माने, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, पोह जफर शेख, पोअ भिमराव पवार, संतोष संकपाळ, एजाज शेख, संदीप सानप, मपोह गदई यांनी केली आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            