जेष्ठ पत्रकार विठ्ठल भंगाळे यांचा विशेष सत्कार व गुणवंत विद्यार्थी सन्मानित
ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल भंगाळे यांचा सत्कार; 40 जणांचे रक्तदान
स्वातंत्र्य दिनानिमित्त केले कार्यक्रमाचे आयोजन...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. 18 (डि-24 न्यूज) :- लेवा पाटीदार मित्र मंडळ व महिला मंडळ, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदान शिबिर व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल भंगाळे यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
दुपारी दोन वाजता आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉ. जितेंद्र पिंपळे (एम्स हॉस्पिटल) यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात एकूण 40 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
सायंकाळी पाच वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश कोलते पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. राजेंद्र निवृत्ती खडसे (शासकीय तंत्रनिकेतन, छत्रपती संभाजीनगर), सौ. हेमलता भूषण गारसे (मुख्याध्यापिका) व सौ. अलका तळोले उपस्थित होत्या.
माहिती व जनसंपर्क मंत्रालयातर्फे ‘ज्येष्ठ पत्रकार’ म्हणून गौरविण्यात आलेले पत्रकार विठ्ठल भंगाळे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच इयत्ता सातवी, दहावी, बारावी तसेच पदवी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या एकूण 75 गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला.
गुणवंत विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्याची गरज – प्रा. राजेंद्र खडसे
“समाजात गुणवंत विद्यार्थ्यांची कमतरता नाही; मात्र त्यांना योग्य दिशा देण्याची गरज आहे,” असे प्रतिपादन प्रा. राजेंद्र खडसे यांनी केले. विद्यार्थ्यांनी पुढील वाटचाल करताना तीन गोष्टी लक्षात ठेवाव्यात. त्यामध्ये स्वतःची आवड, आपल्यातील कौशल्य आणि शिक्षणानंतर उपलब्ध संधींचा शोध घेणे या बाबी महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकांनी विद्यार्थ्यांवर आपल्या इच्छेनुसार शिक्षण लादू नये. विद्यार्थ्यांची आवड व क्षमता लक्षात घेऊन त्यांना पुढील शिक्षणाची दिशा निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे, असे आवाहनही प्रा. खडसे यांनी केले.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमास मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, पालक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थि
त होते.
What's Your Reaction?