टीव्ही सेंटर येथे राष्ट्रवादीने केले अजितदादा पवार यांचे भव्य स्वागत
टीव्ही सेंटर येथे राष्ट्रवादीने केले अजितदादा यांचे भव्य स्वागत...
औरंगाबाद, दि.15(डि-24 न्यूज) आज शहरात राज्य मंत्रीमंडळ बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे आगमन झाले. टीव्ही सेंटर, हडको, छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यासमोर त्यांचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिजित देशमुख यांनी जंगी स्वागत केले. यावेळी ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अगोदर छत्रपती संभाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर क्रेनवर असलेल्या मोठ्या हारने त्यांचे स्वागत केले. यावेळी युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. सेल्फि काढण्यासाठी युवकांनी गराडा घातला. आपल्या लोकप्रिय नेत्याला बघण्यासाठी झुंबड उडाली. अजितदादा यांनी कारवर चढत युवकांना हात उंचावून मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतमहोत्सवर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या.
What's Your Reaction?